बंडगार्डन पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! एका एसमाकडून 1 पिस्टल केले जप्त…
पंकेश जाधव संपादक 7020794626
बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी पो उप निरी रवींद्र गावडे व बडे,भोकरे,सरक,वणवे पेट्रोलिंग करत असताना पो उप निरी रवीन्द्र गावडे,पो शि ज्ञाना बडे व मनोज भोकरे याना गोपनीय बातमीदाराच्या बातमीवरून माहिती मिळाली कि एक इसम कमरेला पिस्टल लावून पाच बिल्डिंग या ठिकाणी येणार आहे तरी सदर ठिकाणी सापळा रचून इसम नामे प्रतीक शैलेश सोनवणे वय -22 रा पाचबिल्डिंग,ताडीवाला पुणे यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता 1 पिस्टल मिळून आले तरी बंडगार्डन पो.स्टे . गु .र .न – 05/2024भारतीय हत्यार कायदा 3(25) गुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर प्रवीणकुमार पाटील साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील मॅडम, साहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पो. हवा सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, पो.शि ज्ञाना बडे, संजय वणवे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

