मार्केट यार्ड पोलिस स्टेशन ची दमदार कामगिरी ! रेकॉर्डवरील आरोपी हा अंमली पदार्थाची विक्री करताना मिळुन आल्याने केले अटक


पंकेश जाधव संपादक 7020794626

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मार्केटयार्ड पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे दिलेर ऊर्फ बॉम्बे अनवर खान, वय ३४ वर्षे, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड पुणे याने आंबेडकरनगर परीसरात एम. डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी स्वतःचे ताब्यात मिळून आल्याने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन दाखल गुन्हयात अटक केली आहे.

Advertisement

मार्केटयार्ड पो.स्टे.च्या हद्दीत गा. वरिष्ठांच्या आदेशान्वये मार्केटयार्ड पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रातील रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, चेक करणेकामी वरिष्ठ पोलिस निरीक्षक, यांचे दिमतीत तपास पथकातील सपोनि कांबळे, व पोलिस अमंलदार यांचेसह खाजगी वाहनाने मार्केटयार्ड पो.स्टे. च्या हाद्दीत पेट्रोलींग करुन चालत चालत २०/२५ वा. चे. सुमारास गल्ली नं. १४, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड पुणे येथे आलो असता, सार्वजनिक शौचालय भिंतीचे आड एक इसम संशयास्पदरित्या बसलेला दिसून आल्याने नमुद इसम हा अंधारात का बसलेला आहे हे पाहणे करीता त्याचे जवळ जात असतांना तो रेकॉर्डवरील आरोपी नामे दिलेर ऊर्फ बॉम्बे अनवर खान असलेचे दिसला, तो आम्हास पाहुन पळून जात असतांना थोडयाच अंतरावर पकडुन त्यास तु का पळून जात होतास असे विचारले असता त्याने सुरवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सपोनि कांबळे यांनी त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता, तो सदर ठिकाणी एम.डी. हा अगली पदार्थ विक्री करण्यासाठी थांबल्याचे सांगीतले त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ ४.६१० ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) एकुण १३,०००/- रुपये किंमतीचा अंमली पदार्थ मिळुन आल्याने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं.०६/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि कांबळे करीत आहेत.

सदरची कारवाई, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, श्री. आर. राजा, मा. सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग, श्री. शाहुराव साळवे, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे यांचे आदेशाने तपास पथकाचे सपोनि मदन कांबळे, पो. हवा. थोरात, हिरवाळे, पोटे, पो.ना. जाधव, पो. अंमलदार झायटे, यादव, तायडे यांनी केली आहे.


Maha police NEWS

Cheif Editor : Pankesh jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!