जबरी चोरी करणारा करणारा विधिसंघर्षित बालक ताब्यात 03 मोबाईल जप्त…


पंकेश जाधव संपादक 7020794626

बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी पो उप निरी रविन्द्र गावडे व कर्मचारी पो ना सरवदे,पवार ,पेट्रोलिंग करत असताना पो शि ज्ञाना बडे व मनोज भोकरे गोपनीय बातमीदाराच्या बातमीवरून माहिती मिळाली कि जबरी चोरी करून मोबाईल विकणे कामी एक इसम पाचबिल्डिंग ताडीवाला या ठिकाणी येणार आहे तरी सदर ठिकाणी सापळा रचून इसम नामे -( विधीसंघर्षित )रा – शिवनेरी नगर कोंढवा पुणे यास ताब्यात घेऊन सोबत असलेल्या मोबाईलबाबत विचारपूस असता सदर त्याने ते मोबाईल फोन मोटरसायकल वरून खेचून चोरी कल्याचे कबूल केले त्यानुसार बंडगार्डन पो स्टे गु र नं 25/23 भा द वि कलम 392,34 या गुन्हयावतिरिक्त 2 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत त्याबाबत तपास चालू आहे.

Advertisement

सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर प्रवीणकुमार पाटील साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील मॅडम, साहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन संदीपान पवार , पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पो. हवा सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, पो.शि ज्ञाना बडे, संजय वणवे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!