पर्वती पोलीसांची दमदार कारवाई ! कर्नाटक मधिल कुख्यात धर्मराज चडचंण (DMC) टोळी चा म्होरक्या मड्डु ऊर्फ माडवालेय्या हिरेमठ, पुण्यात तीन पिस्तुलासह जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- अगामी लोकसभा निवडणुकांचे अनुशंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आदेशानुसार बेकायदा शस्त्रे, अग्निशस्त्रे जप्त करुन कारवाई करण्याचे मा, पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांचे सुचनानुसार पर्वती पोलीस स्टेशन हद्दित कारवाई करत असताना दिनांक ११/०२/२०२४ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना त्याचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, कर्नाटक राज्यामधिल कुख्यात धर्मराज चडचंण (DMC) टोळी चा म्होरक्या मड्डु ऊर्फ माडवालेय्या हिरेमठ, हा त्याचे साथीदारांसह घातक अग्निशस्त्र घेवुन पुण्यात येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळताच अपोनि नंदकुमार गायकवाड यांनी वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शना नुसार तपास पथक व पोलीस ठाणे कडील उपलब्ध कर्मचाऱ्यांची तातडीने ४ पथके तयार करुन नगर रोड ते पर्वती हद्दी पर्यत सापळे लावले. त्यानंतर संशयीत आरोपी हे त्याचे कडील पांढऱ्या रंगाचे केटा गाडीमधुन लक्ष्मीनारायण टॉकीज पर्वती पुणे येथे आले बाबत माहिती दि. १२/०२/२०२४ रोजी कळाल्याने पोलीसांनी सर्व पथके एकत्र करुन तेथे ०३ संशयीतांना गाडीसह शिताफीने पकडले असुन त्याचेकडे चौकशी करता. त्यानी त्याचे नावे.१) माडवालेय्या पंचय्या हिरेमठ, वय ३५ वर्षे, रा. एपीएमसी मार्केटजवळ बंबलक्ष्मी इंडी रोड, ता. जि. विजापुर कर्नाटक राज्य, सध्या रा. इलेवन पार्क, पिसोळी उंड्री, पुणे २) सोमलींग गुरप्पा दर्गा, वय २८ वर्षे, रा. एम. बी. पाटीलनगर, सोलापुर रोड विजापुर, ता. जि. विजापुर कनार्टक राज्य, मुळपत्ता- जालगेरी ता. जि. विजापुर व ३) प्रशांत गुरुसिध्दप्पा गोगी, वय ३७ वर्षे, रा. गल्ली नं. २ शिवशंभो नगर, कात्रज कोंढवा रोड पुणे. मुळपत्ता- मु.पो. देवतगत, जुन्या मश्जिद जवळ, ता. सुरपुर जि. यादगीर, राज्य कर्नाटक अशी सांगितले त्याचे अंगझडती घेता त्याचे कडे तीघांचे कबरेला ०३ देशी बनावटीचे पिस्तुल व एकुण २५ जिवंत काडतुसे मिळून आली त्यामुळे त्याचे वर पर्वती पोलीस स्टेशन गुरनं.८६/२०२४ भारतीय हात्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन त्याचे कडुन ०३ देशी बनावटीचे पिस्तुले २५ जिवंत काडतुसे व गुन्हयात वापरलेली गाडी व ०५ मोबाईल असे मिळुन ११,९०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पर्वती पोलीस स्टेशन चे तपास पथाकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक सचिन पवार हे करत आहेत.

Advertisement

पोलीसांनी त्याचे कडे सखोल चौकशी केली असता उत्तर कर्नाटमधील कुख्यात धर्मराज चडचण व महादेव बहिरगोंड (सावकार) या टोळयामध्ये वाद आहे. त्यापैकी धर्मराज चडचण याचा पोलीस चकमकीत मृत्यु झाला असुन त्याचे भाऊ नामे गंगाधर चडचण यांचा खुन महादेव सावकार याचे टोळीने केलेल्या संशयातुन मंडु ऊर्फ माडवालेय्या पंचय्या हिरेमठ याने धर्मराजची (DMC) नावाची गुन्हेगारी टोळी सक्रिर्य ठेवुन तसेच त्याचा मोरक्या होवुन महादेव सावकारवर ४० साथीदार व ०६ गावठी पिस्तुलासह सन २०२० मध्ये हल्ला केला होता. सदर हल्यामध्ये सावकार टोळीचे ०२ साथीदारांचा खुन झाला होता. परंतु महादेव सावकार बचावला होता. तेव्हा पासुन मड्डु हिरेमठ हा सदर टोळी चालवत असुन त्याने विजापुर जिल्हात खुन व खुनासारखे गंभिर स्वरुपाचे गुन्हे करुन दहशत ठेवली आहे सध्या तो पुणे येथील कोंढवा पिसोळी भागात मागिल दोन महिन्या पासुन त्याचे परिवारासह विरुध्द टोळीचे भित्तीपोटी राहणेस आहे. पोलीसांनी निवडणुक प्रक्रियेच्या पार्श्वभुमीवर कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन अचुक माहितीच्या अधारे कौशल्य पुर्वक कामगिरी करुन सदरची अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसासह नमुद विजापुर कर्नाटक मधील टोळी प्रमुख व साथीदारांस शिताफिने पकडुन उत्कृष्ठ कामगिरी केली.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. प्रविण पाटील, पोलीस उप-आयुक्त सो परि. ३ मा. संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग आप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक सचिन पवार, पो. हवा. कुंदन शिंदे, पो. हवा. प्रकाश मरगजे, दयानंद तेलंगे- पाटील, पुरुषोत्तम गुन्ला, अमोल दबडे, अमित चिव्हे, सद्दाम शेख, प्रविण जगताप, कुलदिप शिंदे, महेश जेधे, दत्तात्रय नलावडे, सुभाष मोरे, नानासो खाडे, राकेश सुर्वे, व वाहन चालक बनसोड यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!