“मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गंभीर गुन्हयातील तडीपार गुन्हेगारास मार्केटयार्ड पोलीसांनी कैले जेरबंद…”


पंकेश जाधव संपादक 7020794626

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि.१३/०२/२०२४ रोजी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हादीत गणेश जयंती निम्मीत्त मिरवणुका असल्याने मा. वरिष्ठाच्या आदेशाने आंबेडकरनगर झोपडपट्टीत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी मा. वपोनि सो, यांचे दिमतीत तपास पथकातील श्री मदन कांबळे सपोनि, पोहया ३४५३ थोरात, पोहवा ३१०५ हिरवाळे, पोहवा ६६६० पोटे, पोना ६८५ जाधव, पोना ७५५४ जाधव, पोअं १०४६४ झायटे, पोअं २३९२ यादव, पोर्ज ८२३५ गायकवाड असे पेट्रोलिंग करीत रिक्षा स्टॅन्ड आंबेडकरनगर मार्केटयार्ड पुणे येथे आलो असता, पोजे झायटे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पुणे शहरातुन तडीपार केलेला मार्केटयार्ड पो. ठाणेचे रेकॉर्ड वरील आरोपी सागर मच्छिंद्र इंजे, रा. स.नं. ५७०, गल्ली नं. १४, आंबेडकर नगर मार्केटयार्ड पुणे हा गल्ली नं.०१ येथील सार्वजनिक शौचालयाचे बाजुला उभा असुन त्याचे जवळ धारधार शस्त्र लांबडा सुरा असुन तो म्हणाला की, माझे विरुध्द ज्यांनी ज्यांनी तक्रारी दिल्या त्यांना मी आज संपवनारच असे त्याचे हातातील धारधार शस्त्र लांबडा सुरा हवेत फिरवुन जोरजोरात ओरडुन स्थानिक लोकांच्या अंगावर जात आहे तुम्ही लवकर या, अशी माहिती मिळाल्याने सदरची माहिती ही वपोनि सो यांना कळविली असता त्यांनी सपोनि कांबळे साहेब यांना खात्री करुन कायदेशीर कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिल्याने सपोनि कांबळे यांनी पोलीस स्टाफ व पंचासह बालमीचे ठिकाणी चालत चालत रवाना झाले. बातमी प्रमाणे आम्ही मार्केटयार्ड आंबेडकरनगर गल्ली नं. ०१ चे आडबाजुला उभे राहून पाहणी करता पोअं झायटे यांचे बातमी प्रमाणे रेकॉडवरील तडीपार आरोपी सागर मच्छिंद्र इंजे, रा. स.नं. ५७०, गल्ली नं. १४, आंबेडकर नगर मार्केटयार्ड पुणे हा गल्ली नं.०१ चे बाजुला सार्वजनीक संडासजवळ उभा असलेला दिसला. त्यावेळी सपोनि कांबळे यांचे सोबत पोलीस स्टाफ व पंच त्याचे दिशेने जात असताना त्याची व स्टाफची नजरानजर झाली असता तो स्टाफला पाहून पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन थोड्याच अंतराव १९.३० वा. जागीच ताब्यात घेतले. त्याचेकडुन धारधार शस्त्र लांबडा सुरा जप्त करण्यात आला असुन त्यास मार्केटयार्ड पो.स्टे. गु.र.नं. २७/२०२४ आर्म अॅक्ट कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आले आहे.

Advertisement

सदरची कारवाई श्री अमितेश कुमार सो, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री मनोज पाटील सो, मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री शाहुराव साळवे साो, मा. सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे यांचे आदेशाने तपास पथकाचे सपोनि सपोनि मदन कांबळे, पोहया ३४५३ थोरात, पोहवा ३१०५ हिरवाळे, पोहवा ६६६० पोटे, पोना ६८५ जाधव, पोना ७५५४ जाधव, पोअं १०४६४ झायटे, पोभं ८२३५ गायकवाड, पोअं २३९२ यादव यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!