कोंढवा, विश्रांतवाडी व वानवडी भागातील नागरीकासह ३७,३०,०००/- रु किं.चा कोकेन, मॅफेड्रॉन (एम.डी.) व गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला.
पंकेश जाधव संपादक 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- १) दि.१४/०२/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २. चे स्टाफ हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेले बातमीनुसार संन्ड्री मिरॅकल लाईफ स्पेस सोसायटी समोर, वडाची वाडी, उंन्ड्री, पुणे येथील सार्वजनिक विकाणी इसम परदेशी नागरीक नामे हसेनी मुवीनी मीचाँगा HASSANI MWINYI MCHONGA, वय ३५ वर्षे, रा. स.नं.४३/२, ब्रम्हानंद बिल्डींग, उंड्री C/o सुनिल देवीदत्त मिश्रा यांचेकडे भाडयाने मुळ पत्ता टांझानिया देश याच्या ताब्यातुन ३०,४०,०००/- रु. कि.चा १५२ ग्रॅम कोकोन हा अंमली पदार्थ जप्त करून त्याचे विरुध्द कोंढवा पोस्टे गु.र.नं. १६३/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. २) दि.१४/०२/२०२४ रोजी पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळालेले बातमीनुसार माधवनगर रोड, नंबर १, अगत्य हॉटेल, धानोरी लोहगांव रोड पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे किसन नंदकिशोर लधार, वय ३४ वर्षे, रा रूम नं. १०१, ओयो ७७७४१, न्यु दर्शन कॉलनी, कलवड वस्ती, लोहगांव, पुणे व मुळ गांव ११५ वॉर्ड, नंबर १३ जैन चौक, नोखा, विकानेर, राजस्थान याच्या ताब्यातुन एकुण ४,५०,०००/- रु.कि.चा २२ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२(ब), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
३) दि.१५/०२/२०२४ रोजी पोलीस अंमलदार रविंद्र रोकडे यांना मिळालेले बातमीनुसार इम्प्रेस गार्डन गेट समोर घोरपडी पुणे येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक विकाणी इसम नागे ओकांर अनिल चंडालिया, यय २१ वर्षे, रा. उरूळी कांचन तुपे वस्ती, ढमढेरे बिल्डींग ता हवेली जि पुणे याच्या ताब्यातुन किं.रु.२,४०,०००/- चा ९ किलो गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द वानवडी पोस्टे गु.र.नं.१४३/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. प्रविण पवार, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, दिगंबर चव्हाण, सपोफौ शिवाजी घुले, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, रविन्द्र रोकडे, प्रशांत बोगादंडी, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, दिशा खेवलकर, साहिल शेख, महेश साळुंके, संदिप शेळके, अझिम शेख, नितीन जगदाळे, युवराज कांबळे व दिनेश बास्टेवाड यांlनी केली आहे.
Cheif Editor : Pankesh jadhav