खुनाचे गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा असलेला व पैरोल रजेवर आल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला ०१ गावठी बनावटीची पिस्टल, ०३ जिवंत काडतुसे सह केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- . दि .२१/०२/२०२४ रोजी दरोडा वाहनचोरी विरोधी पथक अधिकारी अंमलदार हसपसर, वानवडी व कोंढवा पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपूढे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, शिवानंद हॉटेल जवळील माई गादी कारखान्ड समोर, खराबी, पुणे येथे अहमदनगर विसापुर जेल मधील परांत रजेवर सुटलेला व पैरोल रजा संपलेली असताना पुन्हा जेल मध्ये हजर न झालेला एक आरोपी इसम हा कात्रज-कोठवा नविन काम चालु असलेल्या रोडवरील हॉट मिक्स प्लेट जवळ, कोया, पुणे येथे पिस्टल पिक्की करण्याकरीता कोणायी तरी बाट पाहत थांबलेला आहे
त्याप्रमाणे वरिष्ठ अधिकारी यांचे आदेशाप्रमाणे सदर ठिकाणी जावुन, शिताफीने सदर इसमांना ताब्यात घेवुन, त्यात्त त्याचा नाव व पत्ता विचारात त्याने त्याचे नाव व पत्ता प्रदीप ऊर्फ शप्पु जर्नादन कोकाटे, वय ३४ वर्षे, रा. वाच मळा, करंदीकर हॉस्पीटल शेजारी, विठ्ठलवाडी, अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व ०३ जिवंत काडतुसे भसा एकुण ५०,६००/- रु. कि.चा माल मिळून माल्याने त्यांचेवर कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर मेथे गुन्हा रजि. नं. २२५/२०२४ जार्म अॅक्ट कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३० (१३) सह १३५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही मा, पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस जायुक्त श्री. प्रपिण पवार, मा अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुनो, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे, राहा, पोलीस निरीक्षक विवेक पासवी, प पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे, विनायक रामागे, दिनकर लोखंडे, गणेश लोखंडे, राहुल इंगळे, सुदेश सपकाळ यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

