स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणाऱ्या महिला चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद.


पंकेश जाधव संपादक 7020794626

स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात चोरटे हे प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे सोन्याचे दागिने चोरी करीत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सदर अज्ञात चोरटयाचा शोध घेणेबाबत आम्ही स्वारगेट पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते.

त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप घुले, अनिस शेख व शिवा गायकवाड यांनी स्वारगेट एसटी स्टॅन्ड परीसरातील सी.सी.टी.व्ही फुटेज तपासुन तांत्रीक विश्लेषनाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्कआऊट करुन स्वारगेट एसटी स्टॅन्ड परीसरात वारंवार पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार संदीप घुले, अनिस शेख व शिवा गायकवाड यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक संशयित महिला स्वारगेट एसटी स्टॅन्डमध्ये संशयितरित्या फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने सदर बातमीबाबत वरिष्ठांना माहिती दिली असता वरिष्ठांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्यावरुन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन पाहणी केली असता मिळालेल्या बातमीप्रमाणेच एका महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सदर महिलेस महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने ताब्यात घेवुन तिचेकडे चौकशी करुन तिस अटक करुन तपासादरम्यान तिचेकडुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या ०४ गुन्हयामधील चोरीस गेलेला एकुण ६० ग्रॅम (०६ तोळे) वजनाचा ०३,६०,०००/- रु किंमतीचा सोन्याचे दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले एकुण ०४ गुन्हे उघड केले आहेत ते पुढीलप्रमाणे –

Advertisement

१) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं ०३/२०२४ भादंवि कलम ३७१ प्रमाणे

२) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं ०६/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

३) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं ४) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं १५/२०२४ १६/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे भादंवि कलम ३७९ प्रमाणे

सदरची कामगिरी ही मा.श्री. प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. स्मार्तना पाटील सो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २. पुणे शहर, मा.नंदिनी वग्यानी सो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) तथा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चेतन मोरे, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पो/अं १०१४७ संदीप घुले, पो/अं ९८२० अनिस शेख, पो/अं १००१६ शिया गायकवाड, पो/अं ८२३९ सोमनाथ कांबळे, पो/अं १००६२ फिरोज शेख, पो/अं १००५७ सुजय पवार, पो/अं ९९६३ दिपक खंदाड, पो/अं १००६८ रमेश चव्हाण, पो/अं ३५४१ प्रविण गोडसे, मपोअं ११०८६ सुवर्णा सांगोलकर व मपोर्ज ३०८९ सुनिता घानगळ यांनी एकत्र मिळून केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!