उत्तमनगर पोलीस स्टेशन दामिनी पथक व मुस्कान संस्थेमार्फत सुरक्षित, असुरक्षित स्पर्शबाबत जनजागृती कार्यक्रम..
पंकेश जाधव संपादक 7020794626
उत्तमनगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- उत्तमनगर पोलीस स्टेशन दामिनी पथक व फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन – मुस्कान मार्फत पोलीस स्टेशन प्रेस्टीज पब्लिक स्कूल मध्ये मुलांना बाल लैंगिक अत्याचार व पॉक्सो कायदा बाबत मार्गदर्शन केले.
0 ते 18 वर्षाच्या आतील मुलांना जर कोणी असुरक्षित स्पर्श करत असेल त्रास देत असेल तर न घाबरता थेट पालक, शिक्षकांना कल्पना द्यावी. बालकांसाठी विशेष कायदे आहेत. त्यामुळे कोणालाही न घाबरता जर त्रास होत असेल तर प्रतिकार करा. पालकांना कल्पना द्या, पोलिसांना माहिती द्या. सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श ओळख.
माननीय पोलीस निरीक्षक शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस्तिज स्कूल येथे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण या कायद्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यासाठी मुस्कान संस्थेचे समुपदेशक प्रमोद पाटील, पूजा कडू व मोहन कवटे, रेणुका नाईक यांनी मुलांना बालक म्हणजे कोण ? बालकांचे अधिकार, सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, स्पर्श कोण व कुठे होऊ शकतात. त्यावेळी आपण काय करावे तसेच असे असुरक्षित स्पर्श होत असल्यास माहिती कोणाला द्यायची हे सांगण्यात आले. व मुस्कान संस्थेचे हेल्पलाईन नंबर 9689062202/912299784 नंबर देऊन बालकांच्या सुरक्षेसाठी असणारा पोक्सो कायदा या विषयी माहिती दिली.
उत्तमनगर दामिनी अश्विनी चौधरी व ऋतुजा मगर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन मुलांना पोलीस दीदी, पोलीस काका उपक्रमा बद्दल माहिती देऊन पोलीस हेल्पलाईन 1098,व 112 बाबत माहिती दिली. सायबर क्राईम,मोबाईल इंटरनेट अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम व उपयोग, वाहतुकीचे नियम या बद्दल माहिती दिली. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुलिका भटनगर मॅडम यांचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव