“लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन अनेक लोकांना फसवणा-या भामटयाला कोंढवा तपास पथक व साऊथ कमान मिलेटरी इंटेलिजन्स यांनी संयुक्त कारवाई करुन घेतले ताब्यात”


पंकेश जाधव संपादक 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे  :- कोंढवा भागाच्या लगत लष्कराचे कंमाड हॉस्पिटल येथुन अकाऊंन्ट (सिव्हिल सर्व्हिस) यापदावरुन स्वेईच्छा सेवानिवृत्त घेतलेले विनायक तुकाराम कडाळे यांनी कंमान्ड हॉस्पीटल व लष्करात विविध पदावर नोकरी लावुन देतो असे आमिष दाखवुन अनिषा साहिल खान रा. खडी मशीन चौक, कोंढवा बुाा पुणे यांचे परिचयाचे लोकांना व नातेवाईकांना कडुन १३ लाख ५० हजार रुपये रक्कम घेवुन त्याची फसवणुक केली होती. त्याबाबत विनायक तुकाराम कडाळे यांच्या विरुध्द कोंढवा पो. ठाणे येथे गुरन.८४/२०२४ भादवि कलम ४२०,४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisement

गुन्हा केल्यानंतर सदर आरोपी याने त्याचा रहाता पत्ता बदलुन दुस-या ठिकाणी राहण्यास गेला होता. त्याच्याबाबत माहिती साऊथ कमान मिलेटरी इंटेलिजंन्ट व कोंढवा तपास पथकातील श्री लेखाजी शिंदे सहा पोलीस निरीक्षक, श्री विकास बाबर सहा. पोलीस निरीक्षक व पथक मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शोध घेत असताना दि.०३/०३/२०२४रोजी तपास पथकातील श्री लेखाजी शिंदे सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अमलदार विकास मरगळे, पोलीस अंमलदार रोहित पाटील व साऊथ कमान मिलेटरी इंटेलिजंन्ट यांना माहिती प्राप्त झाली की, सदर आरोपी हा लुल्लानगर चौकातील सपना पावभाजी सेंटर जवळील हिल व्हुव सोसायटीमध्ये राहत असुन तो घरातुन बाहेर जाताना स्वताःचे अस्तित्व लपवुन वावरत असतो. सदर माहितीच्या अनुषंगाने दि.०३/०३/२०२४ रोजी हिल व्हुव सोसायटीचे बाहेर लष्कर पथक व कोंढवा पो ठाणे तपास पथक सोसायटीच्या आजुबाजुला वेशांतर करुन सापळा रचुन थांबले सदर इसम हा त्याचे राहते घरात नसलेबाबत माहिती मिळाल्याने बराच कालावधी पर्यंत तो घरी येईपर्यंत सापळा कारवाई चालु ठेवली सांय १७.०० वा सुमारास नमुद इसम हा तोंडाला कापड बांधुन जात असताना दिसला सदर इसमाचा त्याचे प्लॅट पर्यंत पाठलाग करुन त्यास त्याचे रहाते घरातुन ताव्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी याने आणखीन तरुणांना बेरोजगारीचा फायदा घेवुन नोकरीचे आमिष दाखवुन फसविले असल्याबाबत माहिती प्राप्त होत असुन त्याबाबत अधिक तपास विकास बाबर सहा पोलीस निरीक्षक हे करित आहे.

वरिलप्रमाणे कामगिरी मा. अमितेशकुमार साो पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त साो परि.०५, मा. गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, स.पो.नि. पो. हवा. अमोल हिरवे, पो हवा राहुल वंजारी, पो. शि. अभिजीत रत्नपारखी, पो.शि. जयदेव भोसले, पो. शि. विकास मरगळे, पो. शि. राहुल थोरात, पो.शि. सुहास मोरे, पो.शि. अभिजीत जाधव, पो. शि. आशिष गरुड, पो.शि. रोहित पाटील, पो शि अक्षय शेंडगे, पो शि शशांक खाडे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!