जबरी चोरी करुन दहशत निर्माण करुन वर्चस्व निर्माण करणाऱ्या अमित नाना चव्हाण आणि त्याच्या साथीदारांविरुध्द मोक्का


पंकेश जाधव संपादक 7020794626

शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- तक्रारदार यांची तक्रार फि, दिनांक ०७/०२/२०२४ रोजी चिंचवड गावकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल चसमध्ये फिर्यादी उभ्या असताना साधारणतः ०५/२० चा सुमारास बस छत्रपती शिवाजी ब्रिजचर पुणे मनपा येथे आली असताना १) अमित नाना चव्हाण यय २७ वर्ष, ससाननगर लेन नं-०२ शिवाजी महाराज पुतळया जवळ निकम हाईटस ०३रा मजला हडपसर पुणे. (टोळी प्रमुख) य नेहा बचन सोनवणे, वय २० वर्ष, रा-निगडी ओटास्किम सेक्टर नं-२२ रुम नं-०१/०१पी, सजंय स्वीटजवळ, निगडी पुणे (टोळी सदस्य) यांनी संगनमताने फिर्यादी यांचे उजव्या हातातील एक सोन्याची बांगडी कटरच्या सहाय्याने तोडुन हातातुन हिसकावून घेऊन बांगडीसह पळून जात असताना बसमध्ये मिळून आले फिर्यादी यांचे तक्रारी परुन शिवाजीनगर पोलीस ठाणेत गुन्हा रजिस्टर नंबर- ४१/२०२४ भादंवि कलम ३९२,३४ प्रमाणे दि. ०७/०२/२०२४ रोजी गुन्हा नोंद करणेत आला आहे. नमुद गुन्हयातील आरोपी टोळीप्रमुख हा हडपसर पोलीस ठाणे रेकॉर्डवरील आरोपीतांची टोळी तयार करुन, शिवाजीनगर, मुढ़या, स्वारगेट, फरासखाना, बंडगार्डन पोलीस ठाणे हद्दीत दहशत निर्माण करुन त्या-त्या भागातील रहिवाशांना मारहाण करुन, सोने, पैसे, मोबाईल असे मौल्यवान वस्तु हिसकावून दहशत निर्माण करत असतो.

Advertisement

यरील सक्रिय टोळीतील सदस्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे दाखल असणा-या गुन्हयात मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर व मा. प्रविण पवार, पोलीस सह आयुक्त पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील अस्तित्वात असलेल्या गुन्हेगारी टोळयांचा बिमोड करण्यासाठी ठोस कारवाई करण्याचे पोलीसांना दिलेले आदेशानुसार मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. संदिप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ १, पुणे शहर, साईनाथ ठोंबरे, सहायक पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर सावंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे, कैलास डाबेराव सहा. पोलीस निरिक्षक, अजित बड़े पोलीस उप निरीक्षक तसेच पोलीस अंमलदार संतोष मेमाणे, रोहित झांबरे, दिलीप नागरे, नलीनी क्षिरसागर, यांनी सदरच्या इसमाविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई होणे करीता प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर यांना प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी आरोपी नामे अमित नाना चच्हाण आणि त्याचे इतर एक साथिदाराविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चेकलम ३ (१) (ii), ३(२) य ३(४) या कलमाप्रमाणे कारवाई करणेकरीता दि.०५/०३/२०२४ रोजी मंजुरी दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. श्री साईनाथ ठाँचरे, सहायक पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे शहर हे करीत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!