पत्नीने प्रियकराचे मदतीने घडवून आणलेला खुनाचा गुन्हा गुंडा विरोधी पथकाने केला उघड


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुंडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि.२३/०२/२०२४ रोजी रात्रौ २२:३० वा. चे सुमारास इसम नामे राहुल सुदाम गाडेकर वय ३६ वर्षे, रा. नन्हे आंबेगाव, पुणे हा फोक्स बैंगन कंपनी, एम.आय.डी.सी. चाकण पुणे या कंपनीत रात्रपाळी करीता मौजे चिंबळी, बर्गेवस्ती ते कुरुळी गावाचे राडने त्याची मोटार सायकल क्र. एम.एच.१४/ जी.बी./४७८४ ही वरुन जात असताना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन लोखंडी हातोड्याने डोकयावर पाठीमागील बाजुस मारुन गंभीर जखमी करुन त्याचा खून केल्याने आळंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६/२०२४ भा.द.वि. कलम ३०२,२०१ प्रमाणे अज्ञात इसमाचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. गुन्हयाचा तपास आंळदी पोलीस स्टेशनचे तपास पथक व गुन्हे शाखेच्या पथकांकडुन तपास करण्यात येत होता.

गुंडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास करीत असताना प्रथम घटनास्थळावरील ते फोक्स बैंगन कंपनी, एम.आय.डी.सी. चाकण पुणे व नन्हे आंबेगाव, पुणे या मार्गावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजवी पहाणी व मयत इसमाची पत्नी सुप्रिया हिच्या मोबाईल नंबरचे तांत्रीक विश्लेषण करून प्रथम तीस ताब्यात घेवुन तिचेकडे योग्य पध्दतीने सखोल चौकशी करता पुढील माहीती उघड झाली…

दाखल गुन्हयातील मयत इसमाची पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर ही नवले हॉस्पीटल, नन्हे आंबेगाव, पुणे येथे नर्स म्हणून कामारा होती, परंतु कोरोना काळामध्ये तीने निमगाव पागा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर येथे लंब चालु केली होती. सदरचा व्यवसाय करीत असताना तिची ओळख दिल्ली येथे सैन्य दलात नोकरी करीत असलेला इसम सुरेश मोटाभाऊ पाटोळे रा. देहूगाव, पुणे याचेबरोबर ओळख व नंतर त्यांचे प्रेमाचे संबंध प्रस्थापित झाले होते, या कारणावरुन सुप्रिया व पती राहुल यांचे वारंवार भांडणे होत होती, सुरेश पाटोळे व सुप्रिया यांना राहुल हा त्यांचे प्रेमात अडथळा असल्याचे जाणवत होते, म्हणुन राहुल याचा कायमस्वरुपी काटा काढण्याचे ठरवले होते. ठरल्याप्रमाणे डिसेंबर २०२३ मध्ये सुरेश पाटोळे याने तो सुट्टीवर असताना त्याचे आते बहीनीचे गावी चिंचपुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर येथे राहणारा रोहीदास नामदेव सोनवणे वय ३२ वर्षे यास सोबत घेऊन तेथील बाजारातुन ०२ लोखंडी हातोडे विकत घेऊन ठेवले व योग्य वेळेची वाट पहात होता.

यातील मयत इसम राहुल गाडेकर याने त्याचा स्वतःचा ०१ कोटी रक्कमेचा विमा काढला होता, त्या विम्याचे मिळणारे रक्कमेतुन काही रक्कम सुप्रिया गाडेकर ही प्रियकर सुरेश पाटोळे व रोहीदास सोनवणे यांना देणार होती.

Advertisement

दिनांक १०/०२/२०२४ रोजी राहुल हा त्याचे गावी अकोले, जि. अहमदनगर येथे त्याचे पत्नीकडे गेला होता व तेथुनच तो फोक्स वॅगन कंपनी, एम.आय.डी.सी. चाकण पुणे येथे कामावर जाण्यासाठी नाशिक पुणे हायवेने त्याचे चार चाकी कारने येत असताना सुप्रिया हीने सुरेश पाटोळे यास फोन करुन तीचा पती राहुल हा निघाला असल्याचे कळविले होते, तेव्हा सुरेश हा त्याची पल्सर मोटार सायकलवर त्याचा मित्र नामे रोहीदास सोनवणे याचेसह येवून पुणे नाशिक रोडवरील घारगाव या गावा जवळ त्याचा पाठलाग करुन कारची काच हातोडीने फोडुन त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु राहुल हा त्या हल्ल्यातुन बचावला होता. सदर बाबत राहुल याने घारगाव पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमांचे विरोधात तक्रार नोद केली होती. सदर हल्ल्यानंतर राहुल हा घाबरलेला असल्याने घरीच थांबलेला होता. परंतु सुप्रियाने वारंवार कामावर जाण्याचा तगादा लावला होता. राहुल व सुप्रिया यांची कामावरुन जाण्याचे कारणावरुन भांडणे झाल्याने राहुल याने आठवडाभर रात्रपाळी देण्याबाबत कंपनीत विनंती केली होती. त्याने कारसाठी व इतर कारणासाठी बँका व पतपेढयांकडून घेतलेल्या कर्जाचे कारणावरुन तो त्याचे नन्हे आंबेगाव, पुणे येथील फलॅटवर न राहता सुप्रियाचे मामाचे घरी बर्गे वस्ती, चिंबळी ता. खेड, जि. पुणे येथे ०४ दिवसांपासुन रहावयास आलेला होता, त्याबाबत सुप्रियाने सुरेश पाटोळे यास सांगितले असल्याने सुरेश पाटोळे हा दोन दिवसांपासुन त्याची रेकी करीत होता. दि.२३/०२/२०२४ रोजी रात्रौ २२:३० वा. चे सुमारास राहुल हा कामावर जाण्यासाठी निघाला असताना सुप्रियाने त्याबाबत सुरेश यास कळविले, सुरेश पाटोळे व रोहीदास सोनवणे यांनी मोपेडवर येवुन त्यास मोटारसायकलवरुन खाली पाडुन मारहान करुन त्याचे पाठीवर उभे राहुन डोक्यावर पाठीमागिल बाजुस हातोडीने घाव घालुन त्यास गंभिर जखमी करुन त्याचा खून करुन ते दोघे पुन्हा मोटार सायकलवर रोहीदास यास त्याचे गावी चिंचपुर येथे सोडुन सुरेश हा प्रथम दिल्ली येथे कामावर गेला व तेथुन हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी हजर राहीला. आरोपी सुरेश मोटामाऊ पाटोळे रा. देहूगाव, पुणे यास राज्य हैदराबाद येथुन व आरोपी नामे रोहीदास नामदेव सोनावणे वय ३२ वर्षे, रा. मु.पो. चिंचपुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर यास त्याचे रहाते घराजवळुन ताब्यात घेवुन आळंदी पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास आळंदी पोलीस स्टेशन करीत आहे.

मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सोो. खेड कोर्ट, राजगुरुनगर पुणे यांचे न्यायालयात महीला आरोपी नामे सुप्रिया राहुल गाडेकर वय ३० वर्षे, रा. कीडस झी शाळे शेजारी शिवाजीनगर, अकोले, ता. अकोले, जि. अहमदनगर हिस हजर करुन तीची दि.१८/०३/२०२४ रोजी पर्यंत व आरोपी सुरेश मोटाभाऊ पाटोळे रा. देहुगाव, पुणे यास व आरोपी नामे रोहीदास नामदेव सोनावणे वय ३२ वर्षे, रा. मु.पो. चिंचपुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर यांची दि.१९/०३/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो, मा. सह पोलीस आयुक्त सौ. व मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. श्री. वसंत परदेशी सोा., पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सतिश माने सोो. यांचे मार्गदर्शना खाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एच.व्ही.माने, श्रे.पो.उप. निरी. हजरत पठाण, पोलीस अंमलदार प्रविण तापकिर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभिरे, मयुर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, शुभम कदम, रामदास मोहीते, तौसिफ शेख, व TAW कडील नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!