सलग १२ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस बारडोली, गुजरात येथुन केली अटक


पंकेश जाधव संपादक 7020794626

युनिट ०५, गुन्हे शाखा पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- युनिट ५ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी युनिटकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे वेगवेगळ्या टिम तयार करुन युनिट ५ कार्यक्षेत्रातील पोलीस अभिलेखावरील पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेत असताना वानवडी पोलीस ठाणे, गुन्हा रजि.नं. १४२/२०१२ भा.द.वि. कलम ४९८,३२३,५०४,५०६,३४ या गुन्हयातील आरोपी नामे वहीम अब्बास पटेल, रा.स. नं.११०, रामटेकडी, हडपसर, पुणे याचे मा.न्यायालयाने वॉरंट काढून सुध्दा तो मिळुन येत नव्हता त्यामुळे मा. न्यायालयाने त्याचा जाहिरनामा प्रसिध्द केलेला आहे.

Advertisement

सदर फरारी आरोपीबाबत पोलीस अंमलदार राजस शेख यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फरार आरोपी वहिम अब्बास पटेल हा स्वतःचे नाव बदलुन तो बारडोली, गुजराज राज्य येथे राहत आहे. अशी खात्रशीर बातमी मिळुन आल्याने त्याचा तेरा वर्षापुर्वीचा फोटो प्राप्त झाला. त्यानुसार मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ युनिट-५कडील एक तपास टिम बारडोली, गुजरात राज्य येथे पाठवली असता तपास टिमने बारडोली येथे त्याचा शोध घेतला असता पोलीसांकडे त्याचा सुमारे तेरा वर्षापूर्वीचा फोटो असल्याने त्याची ओळख पटविणे अवघड होत. पोलीसांनी त्यास शिताफीने पकडण्यासाठी शिस्तबध्द नियोजन करुन फरार आरोपी नामे रहिम उर्फ वहिम अब्बास पटेल वय ४५ वर्षे रा. अस्थान जीम कंपाऊंड, मॅजीक ग्लास शॉप ता. बारडोली जि. सुरत राज्य गुजरात व मुळ स.नं. ११०, रामटेकडी, हडपसर, पुणे यास गुजरात राज्य, बारडोली येथुन ताब्यात घेतले. त्याचेकडे सखोल तपास करता तो १२ वर्षापासुन पोलीसांचे अटकेला घाबरुन वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे नाव बदलुन राहत असल्याची माहिती सांगितली त्यामुळे त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईकामी वानवडी पोलीसांचे ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, राजस शेख, प्रमोद टिळेकर, दया शेगर, पृथ्वीराज पांडुळे, पांडुरंग कांबळे यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!