पुणे शहर पोलीस ॲक्शन मोडमध्ये गुन्हे शाखेकडून गुंडांची ‌झाडाझडती


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- शहरातील सराइत गुन्हेगार व गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. या माेहिमेत पुणे शहर गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस ‌ठाण्यातील पथके सहभागी झाले आहेत.

पुणे लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने गुंडांची ‌झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. गंभीर गुन्ह्यात जामीन मिळवून बाहेर असलेल्या सराइत, तसेच त्यांच्या साथीदारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

पुणे शहरात गेल्या काही दिवसात गाेळीबाराच्या घटना घडल्या. टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान सोमवारी (१३ मे) आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी गुंडांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. दररोज मध्यरात्री पोलिसांकडून तपासणी मोहिम (कोम्बिंग ऑपरेशन) राबविण्यात येत असून, गुंडांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील सराइतांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलैश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांकडून दररोज रात्री शहराच्या वेगवेगळ्या भागातील सराइतांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. सराइतांची माहिती त्वरीत नजीकचे पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्षास द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!