येरवडा मध्यवर्ती कारागृहातील गरीब व गरजु बंद्यांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन
पंकेश जाधव संपादक 7020794626
येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- येरवडा मध्यवर्ती कारागृहातील गरीब व गरजु बंद्यांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन, समुपदेशन, प्रशिक्षण व सहाय्य मिळणेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांचेमार्फत विधी सेवा चिकित्सालय सुरु करण्यात आले आहे. सदर चिकित्सालयामध्ये न्यायाधीन बंदी व शिक्षाधीन बंदी यांच्या विधी सेवेसाठी प्रशिक्षित पुरुष व महिला शिक्षाधीन विधी स्वंयसेवक यांची नेमणूक व प्रशिक्षण NALSA SOP (कारागृह विधी चिकित्सालय २०२२) प्रमाणे करणे आवश्यक आहे.
त्यानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे व फेअर ट्रायल फेलोशिप प्रोग्राम, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसाचे प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन दिनांक २०.०५.२०२४ रोजी सन्मा. श्री. एम. के. महाजन, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे यांचे शुभहस्ते व मा. डी. यु. डोंगरे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांचे उपस्थितीत करण्यात आले. सदर उद्घाटन प्रसंगी मा. महोदयांनी बंद्यांना कायदेविषयक समुपदेशन व मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी निवडलेल्या २० पुरुष व १० महिला शिक्षाधीन बंदी यांना फेअर ट्रायल फेलोशिप प्रोग्राम NLU दिल्ली या संस्थेचे प्रतिनिधी मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तसेच मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांचेकडील रिट याचीका (दिवाणी) क्रमांक ४०६/२०१३ मधील आदेश दिनांक १६.०३.२०२४ नूसार कारागृहांच्या जिल्हास्तरीय पायाभूत सुविधा मुल्यांकन समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार सन्मा. श्री. एम. के. महाजन, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे व मा. डी. यु. डोंगरे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांनी दिनांक २०.०५.२०२४ रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृह व येरवडा महिला कारागृह येथे भेट देवून कारागृहाची पाहणी व तपासणी केली.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे डॉ. बी एन ढोले, उपअधीक्षक, श्रीमती. पी. पी. कदम, श्री. एम एच जगताप, श्री. आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री. सी आर सांगळे, तु.अ.०२, श्री. व्ही. के. खराडे, सुभेदार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे व फेअर ट्रायल फेलोशिप प्रोग्राम, दिल्ली यांचेकडील प्रतिनिधी श्री. आदित्य शेलार यांनी कामकाज पाहीले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

