राष्ट्रसंत आचार्य परमपूजनीय स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी किर्तन सोहळा
पंकेश जाधव संपादक 7020794626
येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे-०६.
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वारकरी आचारसंहिता परीपद तथा हरिभक्त परायण श्री. निलेश महाराज झरेगावकर संकल्पित राष्ट्रसंत आचार्य परमपूजनीय स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी किर्तन सोहळा दि.०७.०६.२०२४ रोजी पार पडला. माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ” जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो” या पसायदानाच्या आकांक्षाचे प्रत्यक्ष प्रकटीकरण करणारा किर्तन सोहळा पार पडला. सदर किर्तन सोहळ्यात राष्ट्रसंत आचार्य परमपूजनीय स्वामी गोविंददेव गिरी महाराज व श्री. निलेश महाराज झरेगावकर यांनी मार्गर्शन केले.
कारागृहातील चार भिंतीच्या आत बंदीस्त बंदीजनांच्या मनावर किर्तनाच्या अभिसिंचनाने मन परीवर्तन घडवुन ” नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ” या जाणिवेतून त्यांच्या अंतरीच्या ज्ञानदीप प्रज्वलित होईल. भक्तीच्या शक्तीची महती संक्रमित करण्यास हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी होईल.
सदर उपक्रम मा. श्री. अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतून व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे, श्री. अनिल खामकर, अधीक्षक, येरवडा खुले कारागृह, पुणे, डॉ. भाईदास ढोले, उपअधीक्षक, श्रीमती. पी. पी. कदम उपअधीक्षक, श्री. एम. एच. जगताप, उपअधीक्षक, श्रीमती. मंजीरी कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, दक्षता पथक, उपमुख्यालय, पश्चिम विभाग, पुणे, श्री. आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री. सी आर सांगळे, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, श्री. व्ही. के. खराडे, सुभेदार तसेच भजनी मंडळ, देवाची आळंदी यांनी कामकाज पाहीले
Cheif Editor : Pankesh jadhav