इंडीयन ऑईल पुरस्कृत व फिडे आयोजित चेस फॉर फ्रीडम परिषदेचे पुण्यात आयोजन
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :-भारतातील अग्रगण्य ऊर्जा उत्पादक कंपनी इंडीयन ऑईल यांनी प्रायोजित केलेल्या व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना(फिडे)यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या चेस फॉर फ्रीडम परिषदेचे आयोजन येत्या 19 ते 21 जुन दरम्यान पुणे येथे करण्यात आले आहे.
फिडेच्या वतीने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांनी या परिषदेचे आयोजन केले असून विविध ठिकाणी तुरुंगात असलेल्या जगभरातील बंदी वानांच्या पुनर्वसनासाठी बुद्धिबळ या खेळाचा कशा प्रकारे उपयोग करता येईल यासंबंधी जगातील विविध देशांमधून आलेले तज्ञ चर्चा करणार आहेत.
चेस फॉर फ्रीडम या प्रकल्पाचा विविध देशांमध्ये कशा प्रकारे यशस्वी उपयोग करण्यात आला आहे, हा प्रकल्प भारतात कशा प्रकारे राबविता येईल, राष्ट्रीय स्तरावर विविध बंदी वाणांच्या अभ्यासातून या प्रकप्लाचा कशा प्रकारे उपयोग करता येईल आणि विविध ठिकाणी बंधिवासात असलेल्यांचे संघ तयार करून आंतर खंडीय स्पर्धा कशा घेता येईल या सर्व विषयांवर या परिषदेत चर्चा करणार आहेत.
क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून सकारात्मक सामाजिक बदल घडविण्यासाठी आणि भारताला क्रिडा क्षेत्रातील आघाडीचा देश बनविण्यासाठी इंडियन ऑईलचे योगदान नेहमीच महत्वपूर्ण राहिले आहे. परिवर्तन – प्रिझन टू प्राईड आणि नई दिशा या अशा उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी आणि संक्रमनात्मक बदल यासाठी इंडियन ऑईल क्रांतिकारक सहभाग देत असते.
याआधी ऑक्टोबर 2023मध्ये पार पडलेल्या तिसऱ्या बंदीवानांच्या आंतर खंडीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत इंडियन ऑईलच्या परिवर्तन उपक्रमा अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आलेल्या पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदी वाणांच्या संघाने एल साल्वादोर चा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. तसेच, याच दरम्यान पार पडलेल्या आंतर खंडीय चेस फॉर फ्रीडम ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेतील युवकांच्या गटात भोपाळच्या बाल सुधारगृहाच्या संघाने सुवर्णपदक पटकावून या उपक्रमाचे महत्व अधोरेखित केले होते.
Cheif Editor : Pankesh jadhav