मा. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे सर यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने गुरुवारी आळंदी व देहू येथे भेट दिली. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच बंदोबस्ताबाबत सूचना केल्या.
संपादक :- पंकेश जाधव 7020794626
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- श्रीक्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थान विश्वस्त मंडळ चे श्री.माणिक महाराज मोरे, श्री.भानुदास महाराज मोरे, श्री.संजय महाराज मोरे तसेच आळंदी येथील श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त श्री. योगी निरंजननाथ, आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. केंद्रे, दिंडी मालक श्री आरफरकल, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. तुकाराम महाराज मुळीक, श्री. संतोष महाराज सुंबे, आळंदी शहरातील दक्षता कमिटीचे श्री. डी. डी. भोसले पाटील, श्री. प्रकाश कुराडे, श्री. संजय घुंडरे पाटील आणि स्थानिक तसेच काही वारकऱ्यांशी यावेळी मा. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी संवाद साधला.
मा.अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी सर, मा. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, मा. पोलीस उपायुक्त श्रीम. माधुरी कांगणे,
मा. पोलीस उपायुक्त बापू बांगर, मा. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार मा. सपोआ विशाल हिरे, मा. सपोआ सचिन हिरे, मा.सपोआ राजेंद्रसिंग गौर, मा.सपोआ देविदास गेवारे, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा हे उपस्थित होते..
पालखीच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. दर्शन घेण्याच्या घाईत अनेकांना आपल्या मोबाईल, रोखरक्कम, दागिन्यांचे भान राहत नाही. याचाच फायदा घेऊन चोरटे अलगद दागिने, मोबाईल, रोख रक्कम चोरून नेतात. मागील वर्षी असे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे यावर्षी पालखीला व मार्गावर देखील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
वारकऱ्यांच्या वेशभूषेत पोलिस
खाकी वर्दीत, साध्या तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत देखील पोलिस पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. पायी वारीदरम्यान चोऱ्यामाऱ्या, सोनसाखळी चोरी, खिसेकापण्याचे प्रकार यावर नजर ठेवण्यात येत आहे.
साध्यावेशातील वॉचर
पालखी सोहळ्यात विविध जिल्ह्यातील चोरटे सहभागी होतात. वारी दरम्यान चोऱ्यामाऱ्या करतात. यंदा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्या गुन्हेगारांवर संबंधित शहरातील पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच मागील वर्षी ज्या भागातील गुन्हेगारांनी पालखी सोहळ्यात गुन्हे केले त्या भागातील अनुभवी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके पालखी सोहळ्यासाठी मागवली आहेत. ही पथके आपापल्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ‘वॉचर’ बनून नजर ठेवत आहेत.
Cheif Editor : Pankesh jadhav