सुदीक्षा फाऊंडेशन यांचेवतीने येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी ‘मनाची अमर्याद शक्ती व ताणतणाव’ या विषयावर आधारीत डॉ. दत्ता कोहिनकर यांचे व्याख्यान


पंकेश जाधव संपादक 7020794626

येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे-०६.

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- श्रीमती उमा गोपाळे विश्वनाथन, सुदीक्षा फाऊंडेशन यांचेवतीने येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी ‘मनाची अमर्याद शक्ती व ताणतणाव’ या विषयावर आधारीत डॉ. दत्ता कोहिनकर यांचे व्याख्यान दि.२१.०७.२०२४ रोजी आयोजित करण्यात आलेले होते. त्यावेळी यांनी बंद्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास चित्रपट दिग्दर्शक श्री. रामकुमार शेडगे आणि डॉ. महेंद्र घागरे पर्यावरण मित्र उपस्थित होते.

Advertisement

कारागृहातील चार भिंतीच्या आत बंदीजनांच्या मनात जीवन जगण्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने तसेच मनाच्या मुलभुत सत्याला सोप्या भाषेत समजण्यासाठी, मानसिक व शारिरीक बंधनातून मुक्त करण्यासाठी सदर उपक्रम सर्वार्थाने यशस्वी होईल. सदर उपक्रम मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतून व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे, डॉ. भाईदास ढोले, उपअधीक्षक, श्रीमती पी पी कदम, उपअधीक्षक, श्री. ए. एस. कांदे वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री. शेरखाण पठाण, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, श्री. सतिष कदम, सुभेदार तसेच सुदीक्षा फाऊंडेशनच्या श्रीमती उमा गोपाळे व इतर सहकारी यांनी कामकाज पाहीले.


Maha police NEWS

Cheif Editor : Pankesh jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!