खुनाच्या गुन्हयातील आरोपीतांस विश्रामबाग पोलीसांनी १ तासाचे आत घेतले ताब्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
विश्रामबाग पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- समर्थ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १८८/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), ६१ (२) सह आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ४ (२५) २७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३), १३५ क्रिमीनल लॉ अर्मेन्मेंट अॅक्ट ०७ अन्वये दाखल गुन्हयातील आरोपी नामे मुख्य आरोपी १. जयंत लक्ष्मण कोमकर २. गणेश लक्ष्मण कोमकर मा. पोलीस उपायुक्त परीमंडळ ०१ श्री संदिपसिंग गिल्ल सो यांनी आदेशीत केल्याने आम्ही पोउनि बस्त्रे, पोहवा शैलेश सर्वे, पोहवा सचिन अहिवळे, पोहवा मयुर भोसले, पोहवा गणेश काठे, पोशि आशिष खरात, पोौश राहल मोरे, पोशि बाबर असे पथकासह आरोपीचा शोध घेत असताना पो. हवा./ १९३३ सचिन अहिवळे यांना त्यांचे बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरील पथकाने बातमी मिळाले ठिकाणी जावून खात्री केली असता वरील इसम मिळून आल्याने त्यास ताब्यात त्यांच्याकडे विचापुस केली असता त्यांची नावे १) जयंत लक्ष्मण कोमकर वय-५२ वर्षे, रा. भवानी पेठ पालखी वितोबा चौक पुणे २) गणेश लक्ष्मण कोमकर वय-३७ रा.३०९ वर्षे, रा. भवानी पेठ पालखी विठोबा चौक, पुणे असे असल्याचे सांगीतले. तसेच त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन गुन्हयाचे पुढील तपासकामी समर्थ पोलीस ठाणे यांचेकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री संदिपसिह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त, श्री साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीमती विजयमाला पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मनोज बरुरे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे, मयुर भोसले, गणेश काठे, आशिष खरात, राहुल मोरे, नितीन बाबर व सागर मोरे यांनी केलेली आहे.
Cheif Editor : Pankesh jadhav