बंद्यांकरीता आयुष मंत्रालया अंतर्गत व योग सर्टीफिकेशन बोर्डाने प्रमाणित केलेला “ योग स्वयंसेवक प्रमाणपत्र अभ्यासक्रम ” चे उदघाटन सन्मा.न्यायमुर्ती श्री.के.के. तातेड साहेब यांचे हस्ते पार पडले.
पंकेश जाधव संपादक 7020794626
ठाणे मध्यवर्ती कारागृह , ठाणे
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक – 02.09.2024 रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात कारागृहातील बंद्यांकरीता महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांचे पुढाकाराने व घंटाळी मित्र मंडळ, ठाणे यांचे सहाय्याने कारागृहातील बंद्यांकरीता आयुष मंत्रालया अंतर्गत व योग सर्टीफिकेशन बोर्डाने प्रमाणित केलेला “ योग स्वयंसेवक प्रमाणपत्र अभ्यासक्रम ” चे उदघाटन सन्मा.न्यायमुर्ती श्री.के.के. तातेड साहेब (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, मानवी हक्कअ आयोग) यांचे हस्ते पार पडले.
योग स्वयंसेवक प्रमाणपत्र अभ्यासक्रम मधील प्रथम बॅच मध्ये कारागृहातील एकूण 35 बंद्यांनी सहभाग घेतला असून सदर अभ्यासक्रम 36 तासाचा आहे. घंटाळी मित्र मंडळ,ठाणे या संस्थेच्या योग प्रशिक्षकाकडून सकाळी 07.30 ते 08.30 या कालावाधीत योग प्रशिक्षण देण्यात येणार आहे.सदर प्रशिक्षण यशस्विरित्या पुर्ण करणाऱ्या बंद्यांना आयुष मंत्रालया अंतर्गत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सदर कोर्स पुर्ण केलेल्या बंद्यांना “ योग प्रोटोकॉल इन्स्ट्रक्टर व योग वेलनेस इन्स्ट्रक्टर ” या ॲडव्हान्स योग अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Cheif Editor : Pankesh jadhav