दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक दोनची कारवाई गावठी दारू सह 4,12,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणें :- दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे  पोलीस निरीक्षक श्री. संदिपान पवार यांचे पथक गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असताना कोंढवा कात्रज रोड बायपास ने जात असताना पोलिस अंमलदार विनय येवले याना रोड वर एक बॉलरो पिकअप गाडी एक इसम संशय रित्या घेऊन जाताना दिसल्याने थांबून चेक केली असता त्यामध्ये 45 प्लास्टिक कॅन मधे प्रत्येकी 35 लिटर अशी ऐकून 1575 लीटर गावठी हातभट्टी तयार दारू किंमत अंदाजे 1,57,500/- रू.कि.ची मिळून आली. सदर बाबत चालक नामे

भगत गणेश प्रजापती वय २४ वर्ष रा बगळे मळा, उरळी कांचनयाचे कडून जप्त करण्यात आलेल्या मालाचे वर्णन पुढील प्रमाणे
१) 1,57,500/- रू अ कि गावठी दारू 45 प्लास्टिक कॅन मधे
२)4500/- रु चे कॅन
३) 2,00,000/- रु.अ.कि बोलेरो पीक उप गाडी
४) 50000/- रू कि मोबाईल
————————————-
4,12,000/-एकुण रू.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कामगिरी मा.सहा.पोलीस आयुक्त गुन्हे -2 श्री. गणेश इंगळे व दरोडा व वाहन चोरी पथकातील पोलीस निरीक्षक श्री. संदिपान पवार तसेच सपोनि बेरड व पोलीस अंमलदार यांनी केली


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!