मोबाईल हॉटस्पॉट मागितलेचे कारणावरुन झालेल्या खुनाचे गुन्ह्यातील आरोपीना १२ तासाचे आत केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०२.०९.२०२४ रोजी नियंत्रण कक्ष पुणे शहर येथून कॉल प्राप्त झाला एका माणसाला दगडाने मारून टाकले आहे त्यात तो मयत झाला आहे. प्राप्त झालेल्या कॉलच्या ठिकाणी मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०५ श्री.आर. राजा, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-०३, पुणे, श्री. संभाजी कदम, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, श्री. निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती. अश्विनी राख, सहा. पोलीस आयुक्त, आस्थापना विभाग, पुणे श्री. ऊंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पो.स्टे. श्री. संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) मुंढवा पोलीस ठाणे पुणे शहर, श्री. निकम, सहा. पोलीस निरिक्षक श्री. अर्जुन कुदळे, पोलीस उप निरिक्षक श्री. महेश कवळे हडपसर पोलीस ठाणे यांनी भेट दिली.

उत्कर्षनगर सोसायटी समोरील फुटपाथवर, हडपसर पुणे येथे एक इसम रक्ताचे थारोळ्यात पडलेला दिसला तसेच त्याचे चेह-यावर कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी धारदार शस्त्राने निर्घणपणे वार करुन चेहरा छिन्नविघ्छीन्न केल्याचे दिसले. सदरचा इसम हा वासुदेव रामचंद्र कुलकर्णी वय ४७ वर्षे रा. बी/५. प्लॅट नं ०८, उत्कर्षनगर सोसायटी, सासवड रोड हडपसर पुणे असा असल्याची माहीती प्राप्त झाली. तसेच त्यांची शनिवार पेठ पुणे येथे गृहकर्ज करुन देण्याची एजन्सी असल्याबाबत समजले.

झाले प्रकाराबाबत मयत इसम याचा भाऊ याने फिर्याद दिल्याने हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं १३८७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०३ प्रमाणे अनोळखी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन श्री. संतोष पांढरे, यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सुचनांप्रमाणे तपासपथक अधिकारी अर्जुन कुदळे, सहा पोलीस निरीक्षक, महेश कवळे, पोलीस उप निरीक्षक, व स्टाफ यांनी दाखल गुन्ह्यातील घटनेबाबत माहीती मिळण्याच्या अगोदर सुमारे ४ तासांचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्याआधारे मिळालेल्या उपयुक्त माहीतीच्या आधारे आरोपी नामे १) मयुर अतुल भोसले वय १९ वर्ष रा. सर्वे नं ०५, वेताळबाबा वसाहत, गणपती मंदिराजवळ गाडीतळ हडपसर पुणे. व इतर ३ विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतले आरोपी यांचेकडे केले तपासात आरोपी यांनी दाखल गुन्हा केल्याची कबुली देवून सांगीतले की, मयत इसम पायी फिरत असताना त्याचेकडे मोबाईल हॉटस्पॉट मागीतले. मोबाईल हॉटस्पॉट मागितल्याचा राग आल्याने मयत इसम व आरोपी यांच्यात शिवीगाळ झाली. तसेच मयत इसम याने आरोपी याच्या कानाखाली वाजवल्याने त्याचा राग मनात धरून खुन केल्याचे सांगीतले.

दाखल गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि-५ यांचे श्री.आर राजा, मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, श्री. संतोष पांढरे, पोनि (गुन्हे), निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे,
पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, दिपक कांबळे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, भगवान हंबर्डे, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, अतुल पंधरकर, अमित साखरे, निलेश किरवे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, अभिजीत राऊत, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.


Maha police NEWS

Cheif Editor : Pankesh jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!