कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान वनराज आंदेकर खून प्रकरणामधील पाहिजे आरोपी युनिट २ कडुन जेरंबद


पंकेश जाधव संपादक 7020794626

युनिट २ गुन्हे शाखा पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- गणेश उत्सवाच्या अनुषंगाने दिनांक ११/०९/२०२४ रोजी युनिट २ प्रभारी पोलिस निरिक्षक प्रताप मानकर यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन हददीत तळजाईनगर भागात कोंम्बिंग ऑपरेशन राबविले असता कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान युनिट २ कडील अधिकारी/अंमलदार हे रेकार्डवरील गुन्हेगार चेक करीत असताना पोलीस हवालदार उज्वल मोकाशी व संजय जाधव यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, वनराज आंदेकर खून प्रकरणातील पाहिजे आरोपी साहिल ऊर्फ टक्या दळवी हा साईसृष्टी मंडळाजवळ थांबला आहे. मिळालेल्या बातमीप्रमाणे लागलीच युनिट २ चे पथक हे साईसृष्टी मित्रमंडळ, तळजाई वसाहत येथे गेले असता २१/१५ वा. सुमारास नमूद पाहिजे आरोपी दिसून आला त्यास पोलीस पथकाने शिताफीने पकडून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव साहिल ऊर्फ टक्या निलेश दळवी, वय १९ वर्षे, रा.स.न.१०, वनशिव वस्ती, तळजाई वसाहत, धनकवडी, पुणे असे सांगितले. सदर आरोपीकडे समर्थ पोलीस स्टेशन गुन्हा रजि.क्र.१८८/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१)६१(२) ४९,१०९,१११, आर्म अॅक्ट ३ (२५), ४ (२५) मपोॲक्ट कलम ३७/१/३संह १३५ क्रि.लॉ.अॅ.क.७ या गुन्हयातील त्याचा सहभाग पडताळला असता त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्याची वैदयकिय तपासणी करुन रिपोर्टने गुन्हयाचे तपासी अधिकारी यांचे ताब्यात त्यास देण्यात आले.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर पोलिस निरीक्षक श्री. प्रताप मानकर, पो.उप.निरी. राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख व शंकर नेवसे या पथकाने केली आहे.


Maha police NEWS

Cheif Editor : Pankesh jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!