परराज्यातुन अवैध अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या आरोपीसह रेकॉर्डवरील ०४ गुन्हेगारांना अटक, ०७ पिस्टल, १४ जिवंत काडतुसे, ०२ मॅक्झीन व स्कॉर्पियो वाहनासह एकूण १५,६५,०००/- रू चा मुद्देमाल मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडुन जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

मालमत्ता गुन्हे विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :-  मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी गणेशोत्सव सण तसेच आगामी विधानसभा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचे अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशन, गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये अवैध्यरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेवुन त्यांचेविरुध्द कडक कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते व त्याबाबत सद्या विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्याअनुशंगाने पोलीस उप आयुक्त श्री संदीप डोईफोडे व सहा पोलीस आयुक्त गुन्हे १, श्री डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे व.पो.नि. श्री विजय ढमाळ, अधिकारी व अंमलदार हे अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांची माहिती घेत होते.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडील पोलीस शिपाई ब.नं. २६४३ गणेश सावंत, पोलीस शिपाई ब.नं. ३०३४ हर्षद कदम व पोलीस शिपाई ब.नं. २६७३ सुमित देवकर यांना त्यांचे गुप्त बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने पथकाकडील स.पो.नि. अभिनय पवार, पो.उप-निरी भरत गोसावी, पोलीस अंमलदार आशिष बनकर, विनोद वीर, सुमित देवकर, गणेश सावंत, हर्षद कदम व रामदास मोरे अश्या पथकाने दि. १२/०९/२०२४ रोजी रेकॉर्डवरील आरोपी नामे १) प्रदिप ऊर्फ अक्षय बाळासाहेब ढगे, वय २८ वर्षे, रा. मुं.पो. आपटी, ता. शिरूर, जि. पुणे २) सुरज अशोक शिवले, वय २४ वर्षे, रा. सदर ३) नवल विरसिंग झामरे, वय २३ वर्षे, रा. पेरणे फाटा, ता. शिरूर, जि. पुणे, मुळगाव बुऱ्हाणपुर, मध्यप्रदेश यांना त्यांचेकडील स्कॉर्पियो गाडी क्रमांक एम एच १२ व्ही सी ०७१९ हिचेसह आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतुन ताब्यात घेवुन त्यांचेकडुन ०३ पिस्टल, ०७ जिवंत काडतुसे व ०२ मॅक्झीन मिळुन जप्त करुन त्यांचे विरूध्द आंळदी पोलीस स्टेशन गु.र.नं.- २६२/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपींची पोलीस कोठडीची रिमांड घेवुन तांत्रिक विश्लेषणे करुन अधिक तपास करता आरोपी नवल झामरे हा मध्यप्रदेश राज्यातुन पिस्टल घेवुन येवुन पिंपरी चिंचवड येथे विक्री करुन तस्करी करीत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. त्याने आरोपी नामे ४) कमलेश ऊर्फ डॅनी कानडे, वय २९ वर्षे, रा. भारतमाता चौक, मोशी, पुणे याचे मार्फतीने ५) पवन दत्तात्रय शेजवळ, वय ३५ वर्षे, रा. नारायणगाव, पुणे यास दिलेले ०१ पिस्टल व ०१ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. तसेच आरोपी नवल झामरे याचेकडुन आणखीन ०३ पिस्टल व ०६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात येऊन नमुद गुन्हयाचे तपासामध्ये एकुण ०७ पिस्टल, १४ जिवंत काडतुसे, ०२ मॅक्झीन व ०१ महिंद्रा स्कॉर्पियो वाहन असा एकुण १५.६५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी नवल विरसिंग झामरे याचे मुळगाव मध्यप्रदेश येथील असुन, तो अवैध अग्निशस्त्रांची तस्करी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अटक आरोपी यांचा गुन्हे अभिलेख तपासला असता आरोपी नामे पवन दत्तात्रय शेजवळ, वय ३५ वर्षे, रा. नारायणगाव, पुणे यांचे विरुध्द चोरी तसेच घरफोडीचे ०५ गुन्हे नोंद आहेत व आरोपी कमलेश उर्फ डॅनी महादेव कानडे याचे विरुध्द मंचर पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न सारखा गंभीर गुन्हा दाखल आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे साो, पिंपरी चिंचवड, मा. पोलीस सह आयुक्त, श्री.
शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), संदीप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, डॉ. विशाल हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिनय पवार, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे, आशिष बनकर, गणेश सावंत, विनोद वीर, सुमित देवकर, हर्षद कदम, विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, सोमनाथ मोरे, नितीन लोखंडे, विशाल गायकवाड, नितीन उम्रजकर, प्रशांत पाटील, गणेश कोकणे, प्रविण कांबळे, चंद्रकांत गडदे, बाबाराजे मुंडे, अमर कदम, समिर रासकर, राहुल खारगे, औदुंबर रोंगे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी, प्रकाश ननावरे, रमेश कारके, पोपट हुलगे यांचे पथकाने केली आहे.


Maha police NEWS

Cheif Editor : Pankesh jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!