फरासखाना तपास पथकाची उल्लेखनीय कामगीरी ! मोबाईल चोरणाऱ्या मध्यप्रदेश व नाशिक जिल्ह्यातील टोळीपैकी ०२ आरोपीनां केली अटक


पंकेश जाधव संपादक 7020794626

फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणें :- दिनांक १७/०९/२०२४ रोजी गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान भाविकांची गर्दीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला असतो. सदरची मिरवणुक बघण्यासाठी फिर्यादी हर्षल अर्जुन निंबाळकर, रा. येरवाडी, देहु गाव जवळ ता. खेड, जि. पुणे हे त्यांच्या भावासोबत बेलबाग चौक पुणे येथे आले होते दुपारी ०२.०० वा. ते ०२.३० वा.चे दरम्यान शिवाजी रोड बेलबाग चौक बुधवार पेठ पुणे येथील लोखंडी बॅरेकेट जवळील सार्वजनिक रोडवर थांबुन गणेश विसर्जन मिरवणुक पाहत असताना, त्यांचे पँटचे खिशातील मोबाईल फोन कोणीतरी अज्ञात इसमाने १०,०००/- रु किमंतीचा एम.आय. (रेडमी) कंपीचा मोबाईल फोन चोरुन नेल्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. १८०/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Advertisement

वरील दाखल गुन्हयाचे गांभीर्य लक्ष्यात घेता फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी व पोलीस अमंलदार यांना गुन्हा उघडकीस आणणेसाठी मोबाईल चोर ताब्यात घेण्याबाबत महत्वाच्या सुचना दिल्यानंतर पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अमंलदार गजानन सोनुने, नितीन जाधव यांचे गोपनीय बातमीचे अनुषांगने मध्यप्रदेश तसेच नाशिक जिल्हयातील टोळीपैकी आरोपी नामे १) फैसल अजीज खान वय २२ वर्षे, रा. रमाबाई नगर, मनमाड, जिल्हा नाशिक २) कालु राजु पारधी वय २५ वर्षे, रा. सुहागपुर, जिल्हा ओसंगाबाद, राज्य मध्यप्रदेश अशा ०२ आरोपीतांना तपास पथकातील पोलीस अमंलदारानीं ताब्यात घेवुन त्यांना दाखल गुन्हयामध्ये अटक करुन, पोलीस अटके दरम्यान त्यांचे ताब्यातुन अंदाजे २,७९,०००/- रु चे वेग- करुन, उल्लेखनिय कामगीरी करण्यात आलेली आहे.
वेगळ्या कंपनीचे एकुण २१ नग मोबाईल फोन हस्तगत आरोपीतांची चोरी करण्याची कार्यपध्दत यातील अटक आरोपी हे गणेश उत्सव यागर्दीच्या सणामध्ये पुणे येथे येवुन गर्दीमध्ये भाविकांचे खिशातील महागडे मोबाईल फोन चोरी करुन, त्यामधील सिमकार्ड तात्काळ फेकुन देवुन मोबाईल फोन बंद करीत असतात. यातील आरोपीतांना वेळेत अटक केल्यामुळे तसेच पोलीसांचे सतर्कतेमुळे गणेश उत्सव मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी होण्याचा अनर्थ टाळण्यात फरासखाना पोलीस स्टेशन येथील तपास पथकाला यश आलेले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त संदिपसिंह गिल, सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती नुतन पवार, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे, पो.नि. (गुन्हे) श्री. अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो. उप-नि. अरविंद शिंदे, सपोफौ मेहबुब मोकाशी, उत्तम कदम, पोलीस अमंलदार, तानाजी नागंरे, महेश राठोड, गजानन सोनुने, नितीन जाधव, बाळासाहेब चव्हाण, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, अर्जुन कुडाळकर, समिर माळवदकर, सुमित खुट्टे, संदिप कांबळे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर, म.पो.अं. रेखा राऊत, यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!