सराईत आरोपी कडून २ गुन्हे उघडकीस आणून २,२१,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल येरवडा तपास पथक कडून हस्तगत


पंकेश जाधव संपादक 7020794626

येरवडा पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन :-पुणे शहरा मध्ये वाहन चोरीचे अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर मा. पोलीस सह- आयुक्त, मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांनी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन वाहन चोरी गुन्हे उघडकीस आणणेच्या अनुषंगाने सुचना दिलेल्या होत्या.
सदर सुचनेच्या अनुषंगाने दि.०२/१०/२०२४ रोजी येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे पोलिस अमंलदार सुशांत भोसले व अनिल शिंदे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन संशयीत इसम दोन मोपेड गाडी विक्री करण्यासाठी येरवडा येथे येणार असल्याची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन श्री. रविंद्र शेळके, यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके व अंमलदार सुशांत भोसले, अनिल शिंदे, विजय अडकमोल, स्वप्निल घोलप यांनी तेथे जावून संशयीत इसमांना पळून जात असताना पकडले. त्यांना ताब्यात घेवून नाव पत्ता विचारता असल्याचे सांगितले. त्यांचे ताब्यात दोन मोपेड गाडी व ६ मोबाईल मिळाले सदर बाबत चौकशी करता उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ चे कलम ३५(ई) अन्वये कारवाई करण्यात आली. आरोपी कडील गाडयाबाबत चतुःश्रृंगी पो.स्टे. कडील अभिलेख पडताळून पाहिला असता चतुःश्रृंगी पो.स्टे.गु.र.नं.६८१/२४ बीएनएस ३०३ (२) व शिक्रापुर पो.स्टे.गु.र.न. ७९६/२४ बीएनएस ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल असल्याने सदरचे २ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हयातील चोरीस गेलेल्या २ मोपेड गाडी व ६ मोबाईल असा एकूण ०२,२१,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, श्री हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, श्रीमती प्रांजली सोनवणे वपोनि येरवडा, श्री. रविंद्र शेळके, पोनि गुन्हे, येरवडा श्रीमती पल्लवी मेहेर, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि सुनिल सोळुंके, पो. अमंलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, स्वप्निल घोलप, विजय अडकमोल यांनी केलेली आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!