सिंहगड रोड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी ! दिवाळीचे मुहूतावर नागरीकांना त्यांचे हरवलेले मोबाईल केले परत
पंकेश जाधव संपादक 7020794626
सिंहगडरोड पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सिंहगडरोड पोलीस स्टेशन हद्दितील नागरीकांचे मोबाईल हँडसेट विवीध ठिकाणी पडुन गहाळ झालेबाबत सिंहगडरोड पोलीस स्टेशन येथे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने नागरीकांचे हरवलेले मोबाईलच्या प्राप्त तक्रारीवरुन मोबाईलचे आय एम ई आय नंबर ट्रेसिंगसाठी ठेवण्यात आले होते. गहाळ झालेल्या मोबाईलचे आय एम ई आय नंबर वरुन मोबाईल कंपन्यांकडुन तसेच शासनाचे CEIR या पोर्टवरून माहिती प्राप्त करुन घेवुन त्याचे तांत्रिक विश्लेषन करुन किंमत रुपये ३,१५,०००/- चे एकुण २३ मोबाईल हस्तगत करून नागरिकांना परत देण्यात आले आहेत. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.
मोबाईल हरविल्यानंतर त्यांची तक्रार पुणे पोलीस वेबसाईट वरील लॉस्ट अॅण्ड फाऊंड वर तसेच शासनाचे CEIR या पोर्टवर तात्काळ नोंद करावी असे आवाहन पुणे पोलीसां मार्फत करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ पुणे श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग श्री. अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगडरोड पोलीस स्टेशन, पुणे श्री. राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस अंमलदार उत्तम तारू, हनुमंत गंभीरे, मयुर शिंदे, अक्षय जाधव यांचे पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव