अट्टल घरफोडी चोरी करणारा व एकुण ०४ घरफोडीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला गुन्हेगार जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा,

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आगामी २०२४ विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी मा. वरिष्ठांनी गुन्हे अभिलेखावरील पाहिजे/फरारी/तडीपार/मोका मधील आरोपींचा शोध घेणेबाबत आदेशित केले होते.
त्याअनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अधिकारी सपोनि प्रविण काळुखे व पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, अजित शिंदे व रविंद्र लोखंडे असे हद्दीत गस्त करीत असताना गस्ती दरम्यान स्टाफमधील पोलीस अंमलदार रविंद्र लोखंडे_यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोंढवा पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं ८६७/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४), ३०५ मधील पाहिजे आरोपी नामे तौसिफ बशीर शेख, रा. मुळपत्ता कासेवाडी, १० नं कॉलनी, म्हसोबा मंदीराजवळ, भवानी पेठ, पुणे हा गुन्हा दाखल झालेपासुन ६ ते ७ महिन्यांपासुन फरार असुन तो १० नं कॉलनी, कासेवाडी, भवानी पेठ, पुणे याठिकाणी सार्वजनिक रस्त्याचे कडेला पार्क असलेल्या ऑटो रिक्षा मध्ये बसलेला आहे अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती.
त्याप्रमाणे मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार इकडील पथकाकडील सपोनि प्रविण काळुखे व वरील स्टाफ असे सापळा रचून ६ ते ७ महिन्यांपासुन वरील नमुद गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी नामे तौसिफ बशीर शेख, वय २५ वर्षे, रा. कासेवाडी, १० नं कॉलनी, म्हसोबा मंदीराजवळ, भवानी पेठ, पुणे व ३ नं गल्ली, अन्वरभाई बिल्डींगमध्ये ३ रा मजला, शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे यास शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेतले व त्याचेकडे अधिक चौकशी करता तो खालील नमुद एकुण ०४ पोलीस स्टेशन कडील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
१) कोंढवा पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं ८६७/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४), ३०५                                          २) कोंढवा पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं ८५३/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४), ३०५
३) कोंढवा पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं ९४०/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४). ३०५
४) सिंहगड रोड पो.स्टे. गुन्हा रजि नं ४२३/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१ (४),३०५

तसेच वरील नमुद पाहिजे आरोपी यास पुढील कारवाईकरीता कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे). श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे १) श्री. गणेश इंगळे, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ श्री. नंदकुमार बिडवई, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस उप निरीक्षक, शाहीद शेख, पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, अजित शिंदे, दत्तात्रय पवार, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, रविंद्र लोखंडे, पोलीस अंमलदार महेश पाटील, साईकुमार कारके, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, अमित गद्रे, अक्षय गायकवाड, नारायण बनकर, यांनी केली आहे.


Maha police NEWS

Cheif Editor : Pankesh jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!