एफ. सी कॉलेजच्या कॅम्पसमधील बॅट-या चोर १२ तासाचे आत जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
डेक्कन पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.२६/१०/२०२४ रोजी ते दि.०४/११/२०२४ रोजी दरम्यान डेक्कन एज्युकेशन सोसा. आयएमडीआर कॉलेज, आगरकर रोड, पुणे चे युपीएस रुममधील जिन्याखाली असलेल्या रॅकमधुन ४३ युपीएस बॅटग्र कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरुन नेले म्हणुन तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन डेक्कन पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १८२/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये दाखल करण्यात आला होता.
सदर तक्रारीवरुन डेक्कन पोलीस ठाण्यातील तपास पथकातील कार्यरत असलेले पोलीस उप निरीक्षक श्री. महेश भोसले, श्री. अजय भोसले यांनी तपास पथकातील स्टाफच्या मदतीने तांत्रिक पुराव्याच्या माध्यमातुन १२तासाच्या आत दोन आरोपीं नामे १) सचिन शहाजी डोकडे, वय २१ वर्षे, रा. बजिरंग बली मित्र मंडळ जवळ, आकाश गंगा सोसायटी समोर, वडारवाडी पुणे, २) राहुल यंकाप्पा पाथरुट, वय २० वर्षे, रा. जयमित्र मंडळ जवळ, जुनी वडारवाडी पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे केलेल्या तपासात सदरचा गुन्हा त्यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करुन गुन्हयाच्या तपासात चोरीस गेलेला मुद्येमाल बॅटआ हा आरोपीतांकडुन हस्तगत करण्यात आलेला आहे.
पुढील तपास सहा. पोलीस उप निरीक्षक डी.जी. शिंदे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उपायुक्त श्री. संदिप सिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग श्री. साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्ताञय सावंत, सहा. पो. फौजदार शिंदे, राजेंद्र मारणे, पोलीस अंमलदार नरेंद्र पवार, सागर घाडगे, वसिम सिध्दीकी, धनाजी माळी, रोहित पाथरुट यांचे पथकाने केलेली आहे
Cheif Editor : Pankesh jadhav