मुंबई येथे दाखल दरोडयाचे गुन्हयात दोन वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीस केले अग्निशस्त्रासह जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने वरिष्ठांचे आदेशाने कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी गुन्हे प्रतिबंधक कारवाई तसेच बेकायदेशीर हत्यार, अग्निशस्त्र वापरणारे यांचेविरोधात कडक कारवाईचे आदेश झाले असताना सदर आदेशाचे अनुशंगाने गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलिस अमंलदार बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले यांना बातमी मिळाली की, एक इसम हा स्वतःचे कब्जात बेकायदेशीरीत्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगत आहे.
सदर प्राप्त बातमीची शहानिशा करणे कामी गुन्हे शाखा, युनिट ६, प्रभारी पोलिस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पथक यांनी आरोपी नामे साहिल राजु शेख, वय २४ वर्षे, रा.३८ मॅजेस्टिक पार्क, बी बिल्डिंग, फ्लॅट नं. १२०६, वडाची वाडी रोड, उंड्री, पुणे यांस कौसरबाग, कोंढवा खुर्द, पुणे येथुन ताब्यात घेतले.
नमुद इसमास विश्वासात घेवुन चौकशी करून त्याचे ताब्यातून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. सदरबाबत काळेपडळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं.१२४३/२०२४, आर्म अॅक्ट कलम ३,२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (अ) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे हे करीत आहेत.
सदर आरोपी हा व्ही. पी. रोड पोलीस ठाणे, मुंबई गु.र.नं.२९७/२०२२, कलम ३९४,३९५,३९७, ५०६ (२), १२० (ब) भा.द.वि. प्रमाणे दाखल गुन्हयात दोन वर्षांपासुन फरार आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे)-२ श्री राजेंद्र मुळीक यांचे मार्ग- दर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरी. रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, महिला पोलिस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे
Cheif Editor : Pankesh jadhav