पूर्व वैमनस्यातून रामटेकडी परिसरात एका तरुणाचा धारदार शस्त्र ने केला खून…..
पंकेश जाधव संपादक 7020794626
वनवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणेः पूर्व वैमनस्यातून महाविद्यालयात जात असलेल्या तरुणाला दोघांनी कोयत्याने वार करुन त्याचा खून केला. यश सुनील घाटे (वय १७, रा. अंधशाळेसमोर, रामटेकडी, हडपसर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत प्रज्वल सुनील घाटे (वय २०, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साहिल लतीफ शेख (वय १८) आणि ताहीर खलील पठाण (वय १८, रा. सर्व्हे नंबर ११०, रामटेकडी, हडपसर) यांना अटक केली आहे. ही घटना रामटेकडी येथील जामा मस्जिदसमोर मंगळवारी सकाळी ७ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ यश घाटे व त्याचे मित्र आदित्य चव्हाण, रेहान पठाण, श्रेयश शिंदे हे रामटेकडी येथून कॉलेजला जात होते. जामा मस्जिद येथे ते आले असताना साहिल शेख व ताहीर पठाण यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन यश घाटे याच्यावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी साहिल शेख व ताहीर पठाण यांचा शोध घेऊन दोघांना अटक केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव