अवैद्य गावठी हातभट्टी दारू तयार करणारे दोन भट्टया उध्वस्त करुन, ९,२७,५००/-रु. कि.चा मुद्देमाल केला हस्तगत ..


पंकेश जाधव संपादक 7020794626

काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शहरात अवैध धंदे वाहतुक यांचेवर परिणाम कारक कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी तपास पथक अधिकारी व अंमलदार व सर्व अधिकारी, अंमलदार यांना अवैध धंदे व वाहतुक यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

वरिष्ठांनी दिलेले आदेश/सुचनांप्रमाणे दिनांक ०६/१२/२०२४ व दिनांक ०७/१२/२०२४ रोजी काळेपडळ कडील तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, परि-पोलीस उप निरीक्षक, अनिल निवाळकर, पोलीस हवालदार ७३१८ परशुराम पिसे, पोलीस हवालदार, ७९५० संजय देसाई, पोलीस अंमलदार ४८०२ लक्ष्मण काळे, पोलीस अंमलदार ८८७१ विशाल ठोंबरे, पोलीस अंमलदार १००७०, सद्दाम तांबोळी, असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे यांना गोपनीय बातमी मिळाली की, औताडवाडी, स्मशान भूमीच्या पश्चिमेस, घुले यांचे घराजवळील असलेल्या ओढयालगत वडाचीवाडी पुणे व सर्व्हे नं.१३/२ ओढयालगत वडाचीवाडी पुणे येथे इसम नामे १) जगदीश भैरुलाल प्रजापती, वय २४ वर्षे, रा. ढेरेकंपनी, म्हसोबा मंदीराजवळ, काळेपडळ, हडपसर, पुणे व २) गुलाब संपकाळ रचपुत वय ३३ वर्षे, रा. पिजनवस्ती, होळकरवाडी पुणे हे त्याचे मालक नामे २. जितू ऊर्फ माकनावत, वय वर्षे अंदाजे ३० वर्षे, रा. वडाचीवाडी, पुणे ३. करण चित्रावत, वय वर्षे अंदाजे ३० वर्षे, रा. वडाची वाडी, पुणे असे मिळुन औताडवाडी, स्मशान भूमीच्या पश्चिमेस, घुले यांचे घराजवळील असलेल्या ओढयालगत वडाचीवाडी पुणे व सर्व्हे नं.१३/२ ओढयालगत वडाचीवाडी पुणे या ठिकाणी गावठी हातभट्टी दारु काढण्यासाठी लागणारे साहीत्य गोळा करुन, दारु काढणेची भट्टी लावून, गावठी हातभट्टी दारु गाळण्याचे तयारीत आहेत.

त्याप्रमाणे मिळालेल्या बातमीच्या आधारे मा. मानसिंग पाटील, वपोनि साो. काळेपडळ पोलीस ठाणे व वर नमूद पोलीस स्टाफ यांनी औताडवाडी, स्मशान भूमीच्या पश्चिमेस, घुले यांचे घराजवळील असलेल्या ओढयालगत वडाचीवाडी पुणे व सर्व्हे नं.१३/२ ओढयालगत वडाचीवाडी पुणे येथे सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली. सदर छापा कारवाईमध्ये दारु गाळणारे दोन इसमास ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव जगदीश भैरुलाल प्रजापती, वय २४ वर्षे, रा. ढेरेकंपनी, म्हसोबा मंदीराजवळ, काळेपडळ, हडपसर, पुणे व गुलाब संपकाळ रचपुत वय ३३ वर्षे, रा. पिजनवस्ती, होळकरवाडी पुणे असे सांगुन त्यांचे मालक नावे त्याचे मालक नामे २. जितू ऊर्फ सचिन प्रकाश मकनावत वय वर्षे अंदाजे ३० वर्षे, रा. वडाची वाडी, पुणे ३. करण चित्रावत, वय वर्षे अंदाजे ३० वर्षे, रा. वडाची वाडी, पुणे, असे असल्याचे सांगितले. सदर ठिकाणावरुन तयार हातभट्टीच्या दारुने भरलेले एकुण १२४ कॅन व १२,००० लिटर कच्चे रसायनसह दोन मोबाईल हॅन्डसेट असा एकुण ९,२७,५००/-रु. (नऊ लाख सत्ताविस हजार पाचशे रुपये) कि.चा मुद्देमाल पुरावे कामी जप्त करण्यात आला आहे. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणेस गु.र.नं.१३३२/२०२४ प्रमाणे भा.न्या.सं. कलम १२३ प्रमाणे सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमसन १९४९ कलम ६५ (ब) (क) (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास परि. पोलीस निरीक्षक, अनिल निंबाळकर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. आर राजा, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त साो. धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांचे सुचने प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, परि-पोलीस उप निरीक्षक, अनिल निबाळकर, पोलीस हवालदार ७३१८ परशुराम पिसे, पोलीस हवालदार, ७९५० संजय देसाई, पोलीस अंमलदार ४८०२ लक्ष्मण काळे, पोलीस अंमलदार ८८७१ विशाल ठोंबरे, पोलीस अंमलदार १००७०, सद्दाम तांबोळी, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.


Maha police NEWS

Cheif Editor : Pankesh jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!