सुयोग लेहेर सोसायटी कोंढवा बुद्रुक महानगरपालिकेकडून परवानगी न घेता रस्ता खोदला व होल मारून विना परवाना पाण्याचे कनेक्शन घेण्यात आले
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा बुद्रुक सुयोग लेहेर सोसायटीकडून काल दुपारी पुणे महानगरपालिकेकडून परवानगी न घेता रस्ता खोदण्यात आला व तसेच तिथून वाहत असलेली मुख्य जलवाहिनीला स्वारगेट पाणीपुरवठा विभागाची परवानगी न घेता त्याला होल मारून कनेक्शन घेण्यात आले हे सर्व प्रकार पाहत असताना आज समाज पार्टीचे पुणे युवा अध्यक्ष निखिल भिंगारदिवे यांनी हा सर्व प्रकार तत्काळ थांबवला व तसेच स्वारगेट पाणीपुरवठा विभागातील खुडे साहेब यांच्याशी फोनवर चर्चा केल्यास असे कळले की त्यांनी परवानगी घेतलेली नाही.
त्यानंतर स्वारगेट पाणीपुरवठा विभागाचे कर्मचाऱ्यांना सांगून मारलेले कनेक्शन तत्काळ काढण्यात आले. येथील स्थानिकांची अशी मागणी आहे की इतर लोकांना पाणी मिळण्याकरिता रात्री अपरात्री वाट बघावे लागतील मात्र हे सोसायटी वाल्यांनी परवानगी न घेता असे कनेक्शन मारतात आणि जास्त मात्र पाणी सोसायटीला मिळत त्यामुळे इतर लोकांना पाण्याची समस्या खूप जाणवत असते त्यामुळे येथील स्थानिकांची मागणी अशी आहे की सोसायटी वरती दंडात्मक कारवाई करण्यात यावी व कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे.
Cheif Editor : Pankesh jadhav