नवीन वर्षाच्या व नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर” राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाईत बनावट स्कॉच व्हिस्की दारूचे रु.५,९६,५१०/- किमंतीचा मुद्देमाल जप्त.
पंकेश जाधव संपादक 7020794626
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०६/१२/२०२४ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मा. आयुक्त श्री. विजय सुर्यवंशी साहेब, मा. संचालक अंमलबजावणी व दक्षता श्री.पी.पी. सुर्वे साहेब मा.विभागीय उप-आयुक्त, पुणे विभाग पुणे श्री. सागर धोमकर साहेब, मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे श्री. चरणसिंग राजपुत साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करणेकामी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे यांनी चिंचवड गावच्या हद्दीत, चिंचवड पिंपरी लिंक रोडवर, हॉटेल ईगल गार्डन समोर, चिंचवड, पुणे येथे बनावट स्कॉचचा साठा उध्वस्त केला.
मा.उप-अधीक्षक, पिंपरी चिंचवड श्री. सुजित पाटील, यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार कमी प्रतीचे मद्य, उच्च प्रतीच्या रिकाम्या स्कॉचच्या बाटल्या मध्ये भरून बनावट स्कॉच व विदेशी मद्याची विक्री होते असल्याने त्यांनी श्री. अभय ओटे दुय्यम निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथक निर्माण केले. सदर पथकाने हॉटेल इंगल गार्डन समोर, चिंचवड, पुणे याठिकाणी सापळा रचून वाहतूक करीत असताना इसम नामे धनजी जेठा पटेल हा उच्च प्रतीच्या स्कॉचच्या रिकाम्या बाटल्यामध्ये कमी प्रतीचे विदेशी मद्य अशा एकूण २४ बाटल्या तसेच तीनचाकी रिक्षाचालक बाबासाहेब शिवाजी धाकतोडे रिक्षा वाहन क्र. एमएच- १४-जेपी-०८८४ यामधून अवैध मद्याची वाहतूक करीत असताना मिळून आल्याने दोन्ही इसमांस जागीच ताब्यात घेण्यात आले.
त्यात पुढील तपास करीत असताना सदरील अवैध मद्य मारूंजी गावावरून आणल्याचे निष्पन्न झाल्याने सदरील ठिकाणी मारूंजी गावचे हद्दीत, स्प्रिंग वुडस सोसायटी, फ्लॅट नं.२०१, स.नं.०२, ता. मुळशी, जि. पुणे या त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात विविध अॅण्डच्या उच्च प्रतीच्या स्कांचच्या १ लि. क्षमतेच्या एकूण १८ सिलबंद बाटल्या तसेच विविध ग्रॅण्डच्या उच्च प्रतीच्या स्कॉचच्या ११० रिकाम्या बाटल्या, बुचे, लेबले इ. साहित्य, ०१ तीनचाकी रिक्षा, ०१ दुचाकी वाहन, ०१ मोबाईल फोन असा एकूण रू.५,९६,५१०/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यास जागीच अटक करून ताब्यात घेतले. त्याचे विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयामधील मुख्य आरोपी धनजी जेठा पटेल याचे बाहेर राज्यातील संबंध असण्याची शक्यता असून पुढील तपास श्री. अभय अ. औटे दुय्यम निरीक्षक हे करीत आहेत.
सदर कारवाई करीता निरीक्षक श्री.एस.यु.शिंदे, श्री. अभय अ. औटे, श्री.बी.जी. रेडेकर, श्री. गणेश पठारे, श्रीमती. अमृता पाटील. दुय्यम निरीक्षक व कर्मचारी वर्ग सर्वश्री प्रमोद पालवे, विजय घंदुरे, संतोष गायकवाड, रसुल काद्री, प्रमोद खरसडे, यांनी भाग घेतला.
या गुन्हयाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आवाहन करण्यात येते की, नवीन वर्षाच्या व नाताळ सणाच्या निमिताने मद्य प्राशन करणाऱ्या नागरीकांनी केवल स्वस्त दराने आणि घरपोच मद्य मिळत आहे म्हणून मद्य खरेदी न करता अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच मद्य खरेदी करावे. अन्यथा स्वस्त दरात उपलब्ध होणारे मद्य बनावट, भेसळीचे किंवा कमी दर्जाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याद्वारे पुढे मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे श्री. चरणसिंग राजपुत साहेब यांचेकडून असेही आवाहन करण्यात येते की, बेकायदेशीर मद्य व्यवसायात सामील असणा-या व्यक्तींची माहीती स्थानीक राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांचे कार्यालयीन क्र. ०२०-२६१२-७३२१ यावर कळवावे. तसेच अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या टोल फ्री क्र.१८००२३३९९९९ व व्हॉटसअप क्र.८४२२००११३३ यावर संपर्क साधावा.
Cheif Editor : Pankesh jadhav