दुचाकी चोरणा-या आरोपीकडुन एकुण ०२ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणुन एकुण ०२ दुचाकी गाड्या जप्त
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये दुचाकी वाहनांचे चोरीला आळा बसावा याकरीता विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अधिकारी व अंमलदार असे बंडगार्डन पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं ३५७/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) या गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा व चोरीस गेले दुचाकी गाडीचा शोध घेत असताना पोलीस नाईक ७५५९ रविंद्र लोखंडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, मालधक्का चौकाकडुन पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडच्या कडेला फुटपाथलगत गुन्हयातील आरोपी नामे बबन सिताराम शिर्के, वय 41 वर्ष रा. शिक्रापूर पुणे हा चोरीचे दुचाकी गाडीसह उभा असलेबाबतची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन नमुद आरोपीचे ताब्यात मिळुन आलेल्या दुचाकी गाडीचे इंजिन नं व चासिस नंबरवरुन वाहन अॅपव्दारे व आर.टी.ओ. नंबरवरुन माहिती काढली व गुन्हे अभिलेखावरील अभिलेख पाहता सदर दुचाकी गाडीबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं ३५७/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंद असलेबाबत माहिती समजल्याने नमुद आरोपीकडे अधिक चौकशी करता त्याने आणखीन ०१ दुचाकी गाडी चोरी केल्याचे सांगितल्याने नमुद आरोपीकडुन एकुण ०२ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
१) बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि. नं. ३५७/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) २) बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर, गुन्हा रजि नं. २३७/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२)
वरील नमुद आरोपीकडुन पुणे शहरचे एकुण ०२ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणुन त्याचेकडुन किं रु ५०,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पुणे शहरचे पोलीस आयुक्त मा. श्री. अमितेश कुमार, मा. श्री. पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मा. श्री निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त मा. श्री. गणेश इंगळे, गुन्हे शाखा १, पुणे शहर व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली प्रविण काळुखे, पोलीस हवालदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, गणेश ढगे, अजित शिंदे, दत्तात्रय पवार, पोलीस नाईक रविंद्र लोखंडे, पोलीस अंमलदार साईकुमार कारके, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, अमित गद्रे, नारायण बनकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.
Cheif Editor : Pankesh jadhav