लोणी काळभोर पोलीसांनी तब्बल ५ धारदार कोयत्यांसह तडीपार इसम व इतर ३ इसमांना ताब्यात घेवुन कायदेशीर कारवाई केलेबाबत.
प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी
लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे दि. ०६/११/२०२५ रोजी दुपारी १३/०० वा. चे सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील यरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांचे आदेशान्वये तपास पथक अधिकारी श्री कृष्णा बाबर व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार हे लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार इसम व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना त्यांना त्यांचे गोपनिय बातमीदरामार्फत घोरपडे वरती लोणी काळभोर परिसरात ३ इसम त्यांचेजवळ कोयते बाळगुन ट्रीपलसीट दुचाकी गाडीवरुन अंबीका माता मंदिराचे दिशेने जाब आहेत वगैरे मजकुरची खबर प्राप्त झाली.
सदर खबर प्राप्त होताच सपोनि श्री कृष्णा बाबर व त्यांचे पथक लागलीच खबरीचे अनुषंगाने घोरपडेवस्ती भागात रवाना झाले. त्यावेळी एका दुचाकी मोपेड गाडीवरुन ३ संशयीत इसम जात असल्याचे पोलीसांना दिसुन येताच त्यांनी त्यांचा पाठलाग केला. पोलीस पाठलाग करत असल्याचे त्यांचे लक्षात येताच ते अतिशय भरधाव वेगाने त्यांची दुचाकी गल्ली बोळातुन पळवू लागले. त्यावेळी लोणी काळभोर पोलीसांनी अतिशय कौशल्यपुर्ण रित्या सदर संशयीत इसम जात असलेल्या रोड चे चहुबाजुंनी त्यांची घेरेबंदी करुन त्यांना अंबिका माता मंदिर कदमवाकवस्ती, पुणे येथे पाठलाग करुन पकडले. त्यावेळी सदर इसमांचे ताब्यात तब्बल ४ धारदार कोयते मिळुन आले. त्याबाबत त्यांचेकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलीसांनी त्यांना दि. ०६/११/२५ रोजी १३/४० वा. ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली चौकशीदरम्यान त्यांनी त्यांचे नाव व पत्ते १) प्रकाश काळु कांबळे, वय २० वर्षे, रा. काका पवार तालीम जवळ, फ्लॅट नं. ४०६, विघ्नहर्ता सोसा. जांभुळवाडी, कात्रज, पुणे २) मयुरेश्वर दत्तात्रय इटकर, वय १८ वर्षे, रा. कुमजाई माता मंदिरा जवळ, खांडगेवस्ती, टेकवडी गाव, ता. पुरंदर, जि. पुणे ३) अक्षण रविंद्र चव्हाण, वय १८ वर्षे, रा. काका पवार तालीम जवळ, फ्लॅट नं. ६०३, विघ्नहर्ता सोसा. जांभुळवाडी, कात्रज, पुणे असे असल्याचे सांगितले, सदर इसमांकडुन त्यांचे ताब्यातील ४ कोयते, दुचाकी गाडी व मोबाईल जप्त करुन सुमारे १,४१,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.
त्याबाबत त्यांचेविरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाणेस गु. र. नं. ४८८/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५). महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (२) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला असुन त्यांना अटक करणेत आली आहे. नमुद आरोपीचा मोठा घातपाताचा कट असल्याची शक्यता असल्याने त्याबाबत सखोल तपास करणेकरीता मा. न्यायालयामार्फत पोलीस कस्टडी रिमांड घेणेत आली आहे.
त्याचप्रमाणे याव्यतिरीक्त लोणी काळभोर पोलीसांनी दि. ०६/११/२०२५ रोजी गुन्हे नियंत्रण पेट्रोलींग दरम्यान दुपारी १५/०० वा. चे सुमारास लोणी काळभोर गावच्या स्मशानभूमीत तडीपार इसम नामै रोहित महादेव पाटील, वय-२१ वर्ष रा. खोकलाईदेवी चौक, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याची अंझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत लोखंडी कोयता मिळुन आल्याने त्याचेविरुध्द देखील लोणी काळभोर पोलीस ठाणे गु. र. नं. ४८७/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२. ३७(१) (२) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.
अशाप्रकारे लोणी काळभोर पोलीस ठाणेचे तपास पथकाने दि. ०६/११/२०२५ रोजी अतिशय धडाकेबाज कारवाई करत ४ आरोपींकडुन तब्बल ५ लोखंडी धारदार कोयते जप्त करुन त्यांचेविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. लोणी काळभोर पोलीसांचे कर्तव्यदक्षतेमुळे भविष्यातील मोठ्या घातपाताचे प्रकारास प्रतिबंध होणेस मदत झाली आहे.
सदरची उत्कृष्ठ कागगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५. डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक श्री कृष्णा बाबर, म. पोलीस उप निरीक्षक पुजा माळी, पोलीस उप निरी. अनिल जाधव, पोलीस अंमलदार चक्रधर शिरगीरे, योगेश पाटील, राहुल कर्डीले, प्रविण दडस, गणेश सातपुते, रामहरी वणवे, आण्णा माने, संभाजी देवीकर, शैलेश कुदळे, बाजिराव विर, चेतन कुंभार, प्रदिप गाडे, सचिन सोनवणे, अशोक गिरी, यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

