कोंढवा पोलीस स्टेशनकडुन आंदेकर टोळी विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९(मकोका) अंतर्गत कारवाई”


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर 
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:-  कोंढ्या पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील आरोपी नामे १) कृष्णा सुर्यकांत आंदेकर, वय ३६ वर्षे, रा.३८, नाना पेठ, पुणे. (टोळी प्रमुख) (पाहिजे आरोपी) २) सुर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर, वय ६९ वर्ष रा. डोके तालीम मागे, २१. नाना पेठ, पुणे (पाहिजे आरोपी) ३) आमिर उर्फ चिन्या आसीर खान, वय २० वर्षे रा. बुध्द विहार जवळ ग. नं. ९ काकडेवस्ती कोंढवा बुआ। पुणे (पाहिजे आरोपी) ४) मयुर दिगंबर वाघमारे, वय २३ वर्षे रा. गल्ली नं १ सर्वे नं ४ काकडे वस्ती, पुणे ५) स्वराज निलंजय वाडेकर, वय २३ वर्ष, रा.२१ नानापेठ पुणे. (पाहिजे आरोपी) ६) अमन मेहबुब शेख, वय २० वर्षे, रा. गल्ली नं २, काकडे वस्ती कोंढवा बु पुणे, ७) अरबाज अहमद पटेल, वय २४ वर्षे, रा. गल्ली नं ३. काकडे वस्ती कोंढवा बु पुणे  व इतर यांचेविरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ८५७/२०२५ भा.न्या.सं. कलम १०३,६१ (२),१११,३ (५) सह भारतीय हत्यार कायदा ३ (२५), ४(२५) या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (i).३(२).३ (४) (मोक्का) अन्वये कारवाई केलेबाबत.
कोंढवा पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हे करणारे गुन्हेगार नामे कृष्णा सुर्यकांत आंदेकर, वय ३६ वर्षे, रा.३८. नाना पेठ, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ८ साथीदार यांचेवर कोंढवा, भारती विद्यापीठ, बिबवेवाडी, खडक व समर्थ पोलीस स्टेशन येथे शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल असुन त्यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहेत. त्यांची कोंढवा, भारती विद्यापीठ, बिबवेवाडी, खडक व समर्थ पोलीस स्टेशन परिसरात दहशत असुन ते लोकांना दमदाटी करणे, खुन, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे तसेच घातक हत्यारांसह गुन्हा करणे अशा प्रकारचे गुन्हे करीत असे.
श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त सो पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त सो. पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त साो. परिमंडळ-५ डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), नवनाथ जगताप यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार कोंढवा पोलीस स्टेशनकडील सर्व्हेलन्स अधिकारी पोलीस उप निरीक्षक स्नेहल जाधव, सहा. पोलीस फौजदार शेखर कोळी, अंमलदार १०१५५ चव्हाण, पो. अंमलदार ८८८२ एकोर्गे, पो. अंमलदार २३३५ कोकाटे, पो. अंमलदार ९६२ आत्तार, यांनी सदर आरोपीविरुध्द पुरावे गोळा करुन प्रस्ताव वेळेत वरिष्ठ कार्यालयात सादर करुन कोंढवा पोलीस स्टेशन ८५७/२०२५ भा.न्या.सं. कलम १०३.६१ (२),१११,३ (५) सह भारतीय हत्यार कायदा ३(२५), ४(२५) या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (i).३ (२).३ (४

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!