घरफोडी चोरी करणा-या सराईतांकडुन १४ लाख रु. किं. चा. मुद्देमाल केला हस्तगत व घरफोडी चोरीचे ०८ गुन्हे आणले उघडकीस.


उषा सोनवणे पुणे प्रतिनिधी
विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर.
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर, गु.र.नं. ५४४/२०२५, भा.न्या.सं. क. ३०५ (अ), ३३१ (४), ३३१ (३), ३१७(२), ३ (५) अन्वये दि.२९/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. यातील फिर्यादी यांचे घराच्या दरवाज्याचे व गेटचे कड़ी कोयंडा अज्ञात चोरट्याने कशाचे तरी सहाय्याने कापन त्यांचे एकुण १०,५१,०९३ /-रु.कि.चे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी केला होता. त्याप्रमाणे पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु कहे, हरीप्रसाद पुंडे यांनी घटनास्थळावर जावून तपास केला असता सदरच्या गुन्हयातील नमुद आरोपी यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असता आरोपी नामे १) शिवम दत्ता अवचर, वय १९ वर्षे, रा. फ्लॅट नं ०८, कामटे कॉलनी, अभिनव कॉलेज शेजारी, नन्हे, पुणे ०२) नवनाथ उर्फ लखन बाळु मोहिते, वय २२ वर्षे, रा. मनपा शाळेसमोर, आण्णाभाऊ साठे हॉलचे शेजारी, मोर्कडेय नगर, वैदुवाडी, हडपसर, पुणे. यांना अटक करण्यात आले व एक विधीसंघर्षित बालक याला ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांचेकडुन सदर गुन्ह्यातील १० लाख रु.किं. चे सोन्याचे दागिणे व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यांचेकडे अधिकचा तपास केला असता सदर आरोपीने विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिवाळीचे दरम्यान दुकानांचे शटर उचकटुन, बंद घरे फोडुन केलेले एकुण ०७ घराफोडीचे गुन्हे केल्याचे कबुल केले असता इतर गुन्ह्यातील चोरी केलेले एकुण २,०६,०००/- रु.किं. चे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि ०४. पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस स्टेशन, कडील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शरद शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक मनोज बरुरे, पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु कन्हे, हरीप्रसाद पुंडे, रुपेश पिसाळ, गणेश इथापे, दादासाहेब बर्डे, शैलेश नाईक, अंकुश जोगदंडे, सागर कासार, पांडुरंग म्हस्के, अंबादास चव्हाण व राहुल जोशी यांनी केली.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!