औद्योगिक परिसारामधील कंपन्यांमध्ये घरफोड्या करुन ताव्याची चो-या करणारी आंतरराज्यीय टोळी चिखली पोलीसांकडुन जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

चिखली पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड आखतालयातीला औद्योगिक परिसरामध्ये अनेक वर्कशॉप, स्मॉल इंडस्ट्रीज असे अनेक लहान मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. गेले काही दिवसांपासून औदयोगिक परिसरामध्ये चो-यांचे प्रमाण वाढले होते, त्याला प्रतिबंध करण्याचे दृष्टीने चिखली पोलीस स्टेशनकडील तपास पथकांमार्फत रात्रीचे वेळी पेट्रोलिंग नेमण्यात आली असुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने चिखली पोलीस स्टेशन मार्फत वेळोवेळी ट्रैप लावण्यात आले होते.

वाढत्या घरफोड्याचे प्रमाण विचारात घेऊन चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर काटकर यांनी सहा. पोलीस निरीक्षक तोफिक सय्यद याच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन करुन त्याच्यावर ही जबाबदारी सोपविलेली होती. सदरच्या पथकाने पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पडलेल्या घरफोडीचे गुन्हयाचे सिसिटिव्ही फुटेज प्राप्त करुन घेऊन त्याचा अभ्यास केला असता म्हाळुंगे, दिघी तसेच चिखली पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या पड़फोडीचे गुन्हे करणारे आरोपी एकच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पुढे तपास करुन आरोपीचा मागोवा घेण्यास सुरवात केली गुन्हाचे ठिकाणी आरोपीचा येण्याचा मार्ग व परत जातानाचा मार्ग तसेच त्यांनी वापरलेली वाहने याबाबतचा तपास आरोपीचा म्हाळुंगे, दिधी तसेच चिखली परीसरातील घरफोडीच्या ठिकाणापासुनच्या सर्व रस्त्यावरील सिसिटिव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.

तपासांअती आरोपी हे गुन्हा करत असताना दोन मोटरसायकल वरुन येत असुन चोरी केलेला माल एका टेम्पोने नेत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले, सिसिटिव्ही चे फुटेज तसेच परीसराचा डम्प डाटा काढून त्याचे तात्रीक विश्लेषण केले असता उरायिक फ़ोन नंचर हे गुन्हा घडताना घटनास्थळाचे परीसरातच असल्याचे त्यांचे लक्षात आले, तांत्रीक तपासापरुन आरोपी नामे १) अब्दुलकलाम रहिमान शहा वय २३ वर्षे, राह.ऑरेंज हॉस्पीटलचे मागे, कुदळवाडी, चिखली पुणे, मुळ राह. सिहोरवा, पो.कड़ना, थाणा खैसजहा, जि. नवगड, राज्य उत्तरप्रदेश हयास अंगणवाडी चौक, चिखली परीसरात चोरीचा माल विक्रीस घेऊन येत असताना पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास करता त्याने त्याचे साथीदार नामे १) योगेश तानाजी चांदणे वय २६ वर्षे, बंदा ड्रायव्हर राह. बोल्हाईचामळा, गल्ली नंबर १०, जाधववाडी, चिखली, पुणे मुळ राह. मु.पो. भोसर, कुर्दुवाडी, ता. माढा, जि. सोलापुर २) रविशंकर महावीर चौरासिया वय २३ वर्ष, राह. बिराजदार यांची रुम, पाटीनगर, मोई गाय, ता.खेड, जि. पुणे, मुळ राह. ग्राम कमसार, ता.इटवा, थाना त्रिलोकपुर, जि. सिध्धार्थनगर राज्य उत्तरप्रदेश, ३) रिज्ञावान खान, ४) शकील मन्सुरी व दोन विधीसंघर्षग्रस्त चालक या सर्वांनी मिळून चो-या केल्या असल्याचे सांगुन चोरीतील माल नेण्यासाठी योगेश चांदणे याचा टेम्पो नंबर एम.एच.१४. के क्यू. ८२९६ याचा वापर केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे आरोपी नामे योगेश तानाजी चांदणे व रविशंकर महावीर चौरासिया यांना त्यांचे ताब्यातील टेम्पोसह लागलीच शिताफीने ताब्यात घेवून अटक करण्यात आली, तसेच त्याच्या ताब्यात परफोडी करण्यासाठी त्यांनी वापरलेले ग्राइंडर मशीन, पोपट याना, चार्जेबल ट्युब लाईट, ब्यूटेन गैस गन, लोखंडी छच्या, कु-हाडीचे पाते, ड्रिलमशीन, स्टील बोल्ड कटर, हॅक्सा फ्रेम, टी पाना, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असे घरफोडीसाठी लागणारे साहित्य मिळून आले.

Advertisement

अटक आरोपीनी तपासादरम्यान पुणे जिल्हयामध्ये त्यांनी गुन्हे केल्याचे ठिकाण दर्शविले त्यानुसार पुढीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

१) चिखली पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नं. ६८८/२०२३, भादवी कलम ४५७, ३८० प्रमाणे

२) चिखली पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नं. ६७४/२०१३, भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे

३) चिखली पोलीस ३ ठाणे, गुन्हा रजि. नं. ६२९/२०२३, भादवी कलम ४६१, ३८० प्रमाणे

४) दिघी पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नं. ५६३/२०२३ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे

५)चाकण पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नं. ७९१/२०२३ भादवी कलम ३७९ प्रमाणे

६) चाकण पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नं. ७४२/२०१३, भादवी फलम ४६१, ३८० प्रमाणे

७) कोंढवा पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नं. ११८१/२०२३, भादवी कलम ४१४, ४५७,३८० प्रमाणे

८) भारती विद्यापिठ पो. ठाणे गु.रजि. नं. ७७५/२०१३, भादवी कलम ३७१

प्रमाणे अश्या प्रकारे वरील प्रमाणे रु. ५२,६५,९५८/- चे घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात आलेले असून अटक आरोपीकडून रु. २४,४१,१४०/- किमतीचा मुद्देमाल अदयापर्यन्त हस्तगत करण्यात आलेला आहे. अटक आरोपी व पाहिजे आरोपी हे मुळचे उतर प्रदेशातील रहिवासी असुन त्यांनी लहान मुलाचा समावेश असणारी एक गुन्हेगारी टोळी त्यानी निर्माण केलेली असून ते टोळीने पुणे शहरात येतात. एक ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहतात व रेकी करुन रात्रीच्या वेळेस बंद असणा-या कंपन्यामध्ये रात्रीच्या घरफोडया करुन ताब्याचा माल चोरत असल्याचे तपासात निष्पन्न इझालेले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. संदीप डोईफोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडल-३, पिपरी चिंचवड, मा. श्री. विवेक मुगळीकर, सहा. पोलीस आयुक्त, मोसरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. ज्ञानेश्वर काटकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली गुन्हे प्रगटीकरणे शाखेचे सपोनि/श्री. तीफिक सय्यद, पोहया/बावा गर्जे, पोहवा/ सुनिल शिंदे, पोहवा/ चेतन सावंत, पोहवा/विश्वास नाणेकर, पोहचा/ भास्कर तारळकर, पोहवा/संदिप मासाळ, पोहवा/ दिपक मोहिते, पोना/अमर कांबळे, पोना/ कबीर पिंजारी, पोसि/ संतोष सकपाळ, पोशि/संतोष भोर यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!