स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड येथील प्रवाशांचे दागीने चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद.
पंकेश जाधव संपादक 7020794626
स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं.३०/२०२४ भा.द.वि.कलम. ३७९ मधील फिर्यादी नामे भगवान शेटीबा आतार वय ५६ वर्षे, थंदा मिस्त्री काम रा. रुम नं.१० सिद्धीनाथ सोसायटी पिंपरी पाडा सर.डी.एस. हायस्कूल जवळ मालाड (इस्ट) मुंबई हे दिनांक २१/०१/२०२४ रोजी स्वारगेट एस.टी. स्टैन्ड येथे बसमध्ये चढत असताना मोठ्या प्रमाणाव गर्दी होती सदर गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरी केली होती. त्यावरुन फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यावरुन वर नमुद गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेबाबत आम्ही स्वतः तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांना आदेशीत केले होते.
त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार सुजय पवार, संदीप घुले, शिवा गायकवाड यांनी स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे जावुन स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड परीसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन तांत्रीक विश्लेषनाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्कआऊट करुन स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड परीसरात वारंवार पेट्रोलींग करीत असताना तपासादरम्यान मिळालेल्या माहितीप्रमाणेच दिसनारी एक संशयीत महिला स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड परीसरात दिसुन आल्याने लागलीच महिला पोलीस अंमलदार ३०८९ खामगळ यांना बोलावुन घेवून तीचे दिशेने जाताच ती पळून जावु लागल्याने वर नमुद पोलीस स्टाफच्या मदतीने तिचा पाठलाग करुन तिला घेराव घालुन शिताफीने ताब्यात घेवुन तिला तीचे नाव व पत्ता विचारता तिने तिचे नाव व पत्ता कार्तीका शरमा चव्हाण वय ३० वर्षे घंदा रोजंदारी रा. गाडेवस्ती खानापुर ता. शेवगाव जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले तीचेकडे दाखल गुन्हयाबाबत कसुन चौकशी केली असता तिने दाखल गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने तीला अटक करुन तपासादरम्यान तिचेकडुन २,३०,०००/- रुपये किंमतीचे ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने तपासादरम्यान जप्त करण्यात आली आहे.
तसेच गेले १५ दिवसामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले सोने चोरीचे एकुण ०४ गुन्हे व मोबाईल चोरीचा ०१ गुन्हे उघडकीस आले असुन सदर गुन्हयांमध्ये ०३ महिला आरोपी व ०३ पुरुष आरोपी यांना अटक करुन त्यांचेकडुन तपासादरम्यान एकुण ३,६०,०००/- रुपये किंमतीचे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व २,०५,०००/- रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण १६ स्मार्ट फोन असे मिळुन एकुण ५,६५,०००/- किंमतीचा मौल्यवान व किंमती मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री. प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. रमर्तना पाटील सो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, मा. श्रीमती नंदिनी वग्यानी साो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेशसिंग गौड, यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, तपास पथकातील अंमलदार, सुजय पवार, संदीप घुले, शिवा गायकवाड, अनिस शेखा, फिरोज शेख, रमेश चव्हाण, प्रविण गोडसे, विजय कुंभार, सोमनाथ कांबळे, संदीप मुंढे, तात्या देवकाते, दिपक बेंदाड, संजय मस्के, महिला पो.अं. सुनिता खामगळ यांनी एकत्र मिळुन केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

