भवानी पेठ पोलीस लाईनमधील प्रिशा खुट्टेचे स्पेल बी स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे, :- ता. ३ : भवानी पेठ पोलीस लाईनमधील कु. प्रिशा वृषाली सुमित खुट्टे (इयत्ता दुसरी) हिने WIZ International Spell Bee Competition 2025–26 मध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करून शाळा, कुटुंब आणि पुणे शहराचा गौरव वाढविला आहे.
सरदार दस्तुर प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रिशाने राज्यस्तरीय स्पर्धेत १६ वा क्रमांक, तर राष्ट्रीय मेगा अंतिम फेरीत २३ वा क्रमांक मिळविला. तिला राज्यस्तरीय पुरस्कार व प्रमाणपत्र २० मार्च २०२६ रोजी, तर राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार व प्रमाणपत्र ३० मे २०२६ रोजी प्रदान करण्यात आले.
प्रिशाची आई सौ. वृषाली सुमित खुट्टे या सनफायर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, कोथरूड येथे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत असून, वडील श्री. सुमित लता गणपती खुट्टे हे पुणे शहर पोलीस दलातील फरासखाना पोलीस स्टेशनच्या तपासपथकात कार्यरत आहेत.
दोघेही नोकरीच्या व्यस्त जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही त्यांनी मुलीच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देत वेळेचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. घरात इतर कोणाचीही नियमित मदत नसतानाही त्यांनी प्रिशाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने परिश्रम घेतले.
प्रिशाच्या यशामागे तिची मेहनत, जिद्द आणि चिकाटी यांच्यासह आई-वडील, आजी, बाबा, मामा, मामी तसेच वर्गशिक्षिका आलिशा मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
भविष्यात शिक्षक किंवा डॉक्टर बनून समाजसेवा करण्याची प्रिशाची इच्छा आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वांकडून तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

