फरासखाना पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी! वाहनचोराला ठोकल्या बेड्या; ९० हजारांच्या ४ मोटारसायकल हस्तगत
फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर
उषा सोनावणे पुणे प्रतिनिधी
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- . पोलीस आयुक्त साो, श्री अमितेश कुमार यांनी मोटार सायकल चोरी बाबत सतर्क पेट्रोलींग करुन, गुन्हे उघडीस आणण्याबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी श्री संदिप देशमाने यांनी तपास पथकातील अधिकारी व पोलीस अमंलदार यांना वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत महत्वाच्या सुचना व मार्गदर्शन केल्यानंतर तपास पथकातील पोलीस हवा. गजानन सोनुने व पो.अं. चेतन होळकर यांचे गोपनीय बातमी वरुन आरोपी नामे रामेश्वर दशरथ बोडखे वय ३२ वर्षे, सध्या रा. नविन बिल्डींग, ग्रीन पॅलेस हॉटेल, बुधवार पेठ, पुणे यास पोलीस स्टाफचे मदतीने शिताफिने ताब्यात घेवुन त्याकडे वाहन चोरीबाबत विश्वासात घेवुन तपास केला असता, त्याने फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतुन ०४ मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यास फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं.१८९/२०२६ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३(२) या गुन्हयात अटक करुन, पोलीस कोठडी दरम्याने त्याने निर्जनस्थळी लपवुन ठेवलेल्या अंदाजे ९०,०००/- रु किमंतीच्या ०४ मोटार सायकल काढून दिल्याने त्या पंचासमक्ष जप्त करुन, फरासखाना पोलीस स्टेशन कडील ०४ गुन्हे उघडकीस आणण्यात फरासखाना पोलीस स्टेशन येथील तपास पथकाला यश आलेले आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदिप देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गजानन सोनुने हे करीत आहे.
सदरची कामगिरी श्री. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त, श्री. प्रविण दराडे, पोलीस सह आयुक्त श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त, श्री. कृषिकेश रावले पोलीस उप-आयुक्त, परि १ पुणे, श्रीमती अनुजा देशमाने सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदिप देशमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राजेश महाला, पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस उप-निरीक्षक प्रणिल चौगले, पोलीस अंमलदार कृष्णा निढाळकर, नितीन तेलंगे, गजानन सोनुने, चेतन होळकर, महेश पवार, नितीन जाधव, प्रविण पासलकर, महेश राठोड, सुमित खुट्टे, प्रशांत पालांडे, यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

