पुणे शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी ! ०७ पिस्तुले व ११ जिवंत काडतुसे असा एकुण २,८६,२००/- रूचा माल जप्त, पुणे व सातारा येथील सराईत अभिलेखावरील एकुण ९ आरोपींना अटक
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दिनांक ११/०१/२०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट ३ कडील रंगराव पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर ढवळे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस हवा. शरद वाकसे, पोलीस हवा. संजीव कळंबे, पोलीस शिपाई गणेश शिंदे, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते, पोलीस हवा. सुजित पवार, महिला पोलीस हवा. सोनम नेवसे असे अलंकार पोलीस ठाणे हददीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे आकाश बळीराम बिडकर, वय २४ वर्षे, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, नवश्या मारूती जवळ, दत्तवाडी, पुणे हा गावठी पिस्तुल घेवून फिरत आहे. ही बातमी मा. निखील पिंगळे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे व गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १ यांना कळविली. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व बातमीप्रमाणे आकाश बिडकर यास डीपी रोडवरील बस स्टॉपसमोर, एरंडवणा, पुणे येथे पकडले. त्यावेळी त्याचेकडून ०१ बेकायदेशीर गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस जप्त केले आहे. आकाश बिडकर याने पिस्टल बाळगलेबाबत तपास करता त्याचे सांगणे की, “माझा चुलत मामा युवराज भालेराव रा. पुणे याचेबरोबर आमचे धाराशीव येथील जमिनीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे मागच्या वर्षी आमच्यामध्ये दोनवेळा भांडणे झाली असून त्याबाबत पर्वती पोलीस ठाणेस एकमेकांविरूदध तक्रारी दाखल आहेत. माझा चुलतमामा व त्याचा मुलगा हा गुन्हेगारवृत्तीचा आहे. त्याने मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. म्हणून मी, माझे व घराच्यांच्या बचावासाठी माझा मित्र सुभाष बाळु मरगळे वय २४ वर्षे रा. स. नं. ४६, मरगळे हाऊस, जाधव नगर, वडगाव बु., पुणे याचेकडून ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस डिसेंबर महिन्यामध्ये घेतले होते.” असे सांगीतले.
आकाश बिडकर व इतर गोपनिय माहितीवरून सुभाष मरगळे याने आकाश बिडकर याला पिस्टल घेण्यास मदत केल्याबददल अटक केली आहे. सुभाष मरगळे याचेकडे पिस्टल कोठून आणले याबाबत तपास केला असता त्याचे सांगणे की, “माझा मित्र सागर जानू ढेबे वय २४ वर्षे, रा. हिल व्हयु सोसायटी, फ्लॅट नंबर २०२, वाडकर मळा, हडपसर, पुणे मुळ गाव मु. पो. मानगाव ता. वेल्हे, जि. पुणे याचेकडून घेवून मी आकाश बिडकर याला विकले होते.” असे सांगीतले.
सुभाष मरगळे याचे माहितीवरून रेकॉर्डवरील आरोपी नामे सागर ढेबे यास ताब्यात घेतले त्यावेळी त्याचेकडे ०१ गावठी पिस्टल व ०३ जिवंत काडतुसे मिळाली आहेत. सागर ढेबे यास अटक करून तपास केला. त्यावेळी सागर ढेबे याचे सांगणे की, “दि. ३०/११/२०२४ रोजी मी व माझा मित्र ओंकार तानाजी लोकरे रा. रायकर मळा, धायरी, पुणे असे दोघे मोटर सायकलवरून जात असताना ओंकारचे जुन्या भांडणाच्या कारणावरून आमच्याजवळ राहणा-या अथर्व तरंगे व त्याच्या इतर अल्पवयीन मित्रांनी ओंकार यास पाठीमागून गोळी मारली होती व माझ्या पायावरसुध्दा एक गोळी मारली होती. त्यामध्ये ओंकार हा मयत झाला होता.
त्यापासून अथर्व तरंगे व त्याचे मित्र मला जिवे मारणार आहेत असे समजल्याने मी मध्यप्रदेश येथील सुमनकौर मौलकसिंग कौर रा. मु. शिगोर, पोस्ट बेहरामपुरा, खरगोन राज्य मध्यप्रदेश यांचेकडून मला व माझ्या मित्रांना देण्यासाठी ०७ पिस्टल विकत आणली होती. त्यातील ०१ पिस्टल मी माझ्याकडे ठेवले. ०१ पिस्टल सुभाष मरगळे याला दिले. ०१ पिस्टल मी माझ्या तोंडओळखीचा आर्यन कडाळे रा. सातारा याला दिले, ०२ पिस्टल मी माझा नातेवाईक बाळु धोंडीबा ढेबे यास दिले, ०२ पिस्टल मी तुषार माने याला दिले आहेत.” असे सांगीतले.
त्यानंतर सागर ढेबे याचे माहितीवरून व गोपनिय बातमीदाराच्या मदतीने आर्यन विशाल कडाळे, वय १९ वर्षे, रा. २६६ बुधवार पेठ, सातारा यास ताब्यात घेतले असता त्याने सदरचे पिस्टल शुभम दिनेश बागडे, वय २४ वर्षे, रा. साईकृपा बिल्डिंग, गुलमोहर सोसा. सातारा, मुळ रा. नवीन म्हाडा कॉलनी, सदरबाजार सातारा याला विकल्याचे सांगीतले. शुभम बागडे यास ताब्यात घेतले असता त्याने ते पिस्टल गणेश ज्योतीराम निकम वय २५ वर्षे रा. पिरवाडी, सातारा याला विकल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे आर्यन, शुभम, गणेश यांना अटक करून गणेश निकम याचेकडून ०१ पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यानंतर सागर ढेबे याचे माहितीवरून रेकॉर्डवरील तडीपार आरोपी बाळु धोंडीबा ढेबे वय २७ वर्षे, सध्या रा. कृष्णाई हॉटेल, फलटण, जि. सातारा मुळ रा. राममंदीराजवळ, जनता वसाहत, पुणे याचा तपास केला असता त्यास सिंहगड रोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे, पोलीस हवा. केकाण, पोलीस अंमलदार ओलेकर यांचे बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीवरून न-हे येथील व्हिजन शाळेजवळ पकडले. त्याचेकडून ०२ पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
Advertisement
त्यानंतर सागर ढेबे याचे माहितीवरून रेकॉर्डवरील तडीपार आरोपी तुषार दिलीप माने वय २० वर्षे रा. भेंडीचौक, हरणाई बिल्डींगच्या मागे, दुसरा मजला, आंबेगाव बु. पुणे यास ताब्यात घेतले. तुषार याचेकडे पिस्टलबाबत तपास करता त्याने त्याचा रेकॉर्डवरील तडीपार मित्र तेजस मोहन खाटपे रा. कात्रज, आंबेगाव, पुणे यास दिले होते. त्यास गुन्हे शाखा, युनिट २ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनि आशिष कवटेकर, पोलीस उप-निरीक्षक नितीन कांबळे, पोलीस हवा. उज्ज्वल मोकाशी, पोलीस हवा. शंकर कुंभार, पोलीस हवा. शंकर नेवसे, पोलीस अंमलदार निखील जाधव, संजय जाधव, ओंकार कुंभार, हनुमंत कांबळे, गणेश थोरात, साधना ताम्हाणे, अमोल सरडे, पुष्पेंद्र चव्हाण, विनोद चव्हाण, प्रमोद कोकणे, विजय पवार, राहुल शिंदे नागनाथ राख यांनी अटक करून त्याचेकडून ०२ पिस्टल व ०३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याबाबत अलंकार पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ०५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १११ (३), भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, १४२ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास ज्ञानेश्वर ढवळे, सहायक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट ३ हे करीत आहेत.
याप्रकारे सागर ढेबे याने मध्यप्रदेश येथून आणलेली ०७ पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त करून भविष्यात एखादया व्यक्तिचा जाणारा जीव व होणारे गुन्हे यास प्रतिबंध केला आहे.
सदरची कामगिरी ही, श्री अमितेश कुमार साो पोलीस आयुक्त, श्री रंजनकुमार शर्मा साो पोलीस सह आयुक्त, श्री शैलेश बलकवडे साो अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, प्रविणकुमार पाटील साो अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. निखील पिंगळे साो पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री संभाजी कदम साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३, श्री. गणेश इंगळे साो सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १, श्री अजय परमार साो सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व व त्यांचेकडील पोलीस स्टाफ, सिंहगड रोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे व त्यांचेकडील पोलीस स्टाफ, गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार शरद वाकसे, संजिव कळंबे, सुजित पवार, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, सोनम नेवसे, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, महेंद्र तुपसौंदर, संजय आबनावे, लहू सुर्यवंशी, उदय राक्षे, विनायक येवले, विशाल इथापे, राहुल ढमढेरे यांचे पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

