शंभरहून अधिक गुन्हे असणारा कुख्यात गुंड व त्याचे साथीदार दरोड्याच्या तयारीत असताना ०१ गावठी पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, धारधार शस्त्रसाठा व कारसह घेतले ताब्यात


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
युनिट ०६. गुन्हे शाखा पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. वरिष्ठांचे आदेशाने दिनांक १०/०६/२०२६ रोजी पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत कोंबिंग ऑपरेशन कारवाई दरम्यान युनिट ६ कडील पोलीस निरीक्षक, सुदर्शन गायकवाड, पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे, व स्टाफ असे मिळुन युनिट ६ चे हददीत पेट्रोलिंग करीत असताना मांजरी पोलीस स्टेशन हद्दीतील भापकर मळा रोड, रेल्वे पुलाजवळ एक चारचाकी वाहन संशयास्पदरित्या उभे असल्याचे निदर्शनास आले. सदर वाहनाजवळ जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, वाहनातील इसम पोलिसांची चाहूल लागताच कारचा दरवाज्या उघडुन पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यास पोलीस स्टाफचे मदतीने पाठलाग करून त्यांच्यातील तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले असुन उर्वरीत इसम तेथुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना आम्ही त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नावे १) अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी, रा. मांजरीनगर, मांजरी बुद्रुक, पुणे २) रामजितसिंग रणजितसिंग टाक, रा. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे ३) अभयसिंग सिंकदरसिंग जुन्नी, रा. गंगानगर, फुरसुंगी, पुणे अशी असल्याचे सांगितले त्यांना तुम्ही एवढ्या उशिरा येथे काय करीत आहात असे विचारले असता ते आम्हाला उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागल्याने सदर इसमांची व गाडीची झडती घेतली असता, त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे तसेच सहा धारदार शस्त्रे, दरोड्यासाठी लागणारे साहीत्य व कार असा एकुण ०६,११,०००/-रु.की.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन, त्यांना विश्वासात घेवुन अधिक चौकशी करता सदर इसम हे दरोडा टाकण्याच्या तयारीत निघाले असल्याची कबुली दिली आहे. सदर इसमांची गुन्हे रेकॉर्डची पडताळणी केली असता वर नमुद आरोपी नं. १ याचेवर राज्यातील विविध पोलीस ठाणेमध्ये ११९ गंभीर गुन्हे दाखल असुन आरोपी २ व ३ यांचेवर ६ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुद्ध मांजरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.७४/२०२६ भा.न्या.सं.क ३१० (४), आर्म अॅक्ट क ३ (२५),४ (२५), म.पो.का.क ३७ (१) (२) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर कारवाईमुळे मोठा दरोडा व गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच रोखण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. गौहर हसन, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २. श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक, सुदर्शन गायकवाड यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सकटे, श्रीकांत पांडुळे, अमित कांबळे, अनिल जामगे, गणेश माने, उमेश शेलार, शेखर काटे यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!