“बिबवेवाडी पोलीसांनी मोक्यातील टोळी प्रमुख फरार आरोपीस अग्निशस्वासह केले जेरबंद “


पंकेश जाधव संपादक 7020794626

बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ८/११/२०२३ रोजी १२.३० वा. चे सुमारास फिर्यादी यांचा मुलगा प्रेम ऊर्फ यश कदम हा बाहेरून जेवण करून घरी येत असताना त्याचे ओळखीचे सौरभ शिंदे, तेजस जगताप, चंदर राठोड, अनिकेत काटकर व पंकज दिवेकर रा. अप्पर बिबवेवाडी पुणे यांनी त्याला धरून कुसाळकर किराणा मालाचे दुकानाचे गल्लीतून आतील मंदिराचे मोकळया मैदानात अप्पर बिबवेवाडी येथे घेवून जावून त्याचेवर लोखंडी रॉड व लोखंडी हत्याराने जुन्या भांडणारचे कारणावरून दोन्ही हाताचे मनगटावर, दोन्ही पायाचे गुडघ्यावर व नडग्यांवर, पोटावर व डोक्यात वार करून गंभीर जखमी करून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २३९/२०२३, भा.दं. वि. कलम.३०७,३२३,१४३, १४७,१४८, १४९, महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) सह १३५ गुन्हा दाखल असून दाखल गुन्हा नमुद आरोपीनी संघटीतपणे केलेला असल्याने दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३ (४) प्रमाणे कलमवाद करण्यात आली आहे. दाखल गुन्हयामध्ये एकूण तेजस जगताप, अनिकेत काटकर व पंकज दिवेकर यांना अटक करण्यात आलेली आहे.

Advertisement

गुन्हा दाखल झालेपासून गुन्हयातील मुख्य सुत्रधार व टोळीप्रमुख सौरभ शरद शिंदे हा दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी असलेने त्याचा सपोनि श्री प्रविण काळुखे, तपास पथकातील स्टाफ असे मा. गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर व मा. विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनाप्रमाणे पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अमंलदार शिवाजी येवले यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती वरून तपास पथकातील आधिकारी सपोनि प्रविण काळुखे व अमंलदार यांनी आरोपी नामे सौरभ शरद शिंदे, वय २३ वर्षे रा. पुनम गार्डनचे मागे, रोहिडेश्वर बिल्डींग १९/ए, बिबवेवाडी पुणे. यास सापळा रचून शिताफीने पकडून त्याची झडती घेता त्याचे अंगझडती मध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल कि. रु २५,०००/-चे हस्तगत करण्यात आला असून त्याचेविरुध्द बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.६५/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त श्री प्रविण पवार, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर व मा. सहा. पोलीस आयुक्त श्री गणेश इंगळे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनय पाटणकर, तपासपथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रविण काळुखे, पोलीस उप निरीक्षक श्री बालू शिरसट, पोलीस हवालदार, शामराव लोहोमकर, संतोष जाधव, शिवाजी येवले, आशिष गायकवाड, विशाल जाधव, प्रणव पाटील, अभिषेक धुमाळ, ज्योतिष काळे, यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!