बनावट कागदपत्रांचे आधारे चारचाकी गाडयांची विक्री करुन लोकांची फसवणुक करणाऱ्या चोरट्यांना स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद
स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर
प्रेसनोट.
स्वातंयाचा अमृत महोत्स
पंकेश जाधव संपादक 7020794626
स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं.९२/२०२४ भा.दं.वि. कलम ४०६, ४१९, ४२०, ४६३, ४६४, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी नामे गणेश बबन जगदाळे वय २८ वर्षे, धंदा- ड्रायव्हर.रा. खासगाव ता. परांडा जि. धाराधिव यांची दिनांक २५/०२/२०२४ रोजी साय.०७/३० वा.चे सुमारास स्वारगेट बस स्थानक जवळ इसम नामे आयुष कुलथे याने त्याचे नाव नवनाथ खजिने असे खोटे सांगून व त्याच नावाचे व गाडीचे खोटे व बनावट आधार कार्ड, आर. सी. कार्ड इत्यादी कागदपत्रे, फिर्यादी यांना देवून सदर कार ही त्याने भाडे तत्वावर घेवुन त्याचे मालकीची नसताना देखील ती त्याचीच आहे असे भासवुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून व तसे कागदपत्रे सादर करुन इसम नामे आयुष कुलथे, अतिष नागतिलक, प्रथमेश शेटे, श्रीकांत बल्लोरे, सुजित बडगुजर, प्रविण सोनवळे व आकाश सोनवळे व इतर साथीदार यांनी मिळून फिर्यादी यांचे ०३ लाख रुपये घेवून व बनावट कागदपत्रे आधारे कार विक्री करून फसवणुक केल्याने वर नमुद गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयातील आरोपींचा तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिस शेख, शिवा गायकवाड व संदीप घुले यांनी शोध घेवुन दाखल गुन्हयातील आरोपी नामे १) आयुष अभय कुलथे वय २५ वर्षे, धंदा व्यवसाय रा.बी.१००३ गोल्ड फिंगर तमारा सोसायटी रहाटणे पिंपरी पुणे २) सुजित भाईदास बडगुजर वय २६ वर्षे धंदा व्यवसाय रा. सी २४०४ त्रिमया सोसायटी झील चौकाजवळ नन्हे गाव पुणे ३) प्रथमेश संतोष शेटे वय २२ वर्षे धंदा शिक्षण सध्या रा.स्वप्न नगरी हौसींग सोसायटी गुरुद्वारा चौकाजवळ आकुर्डी पुणे यांना वेगवेगळ्या ठिकाणावरुन शिताफीने ताब्यात घेवुन अटक करुन तपासादरम्यान त्यांनी व पाहिजे आरोपी यांनी एकुण १५ ते १७ चारचाकी वाहनांची बनावट कागदपत्रे तयार करुन लोकांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर अटक आरोर्पीकडुन तपासादरम्यान बनावट कागदपत्रे व एकुण ०६ चारचाकी वाहने असा एकुण ३६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा.श्री. प्रविणकुमार पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. स्मार्तना पाटील साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, मा. श्रीमती नंदिनी वग्यानी सो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती गीता बागवडे यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पो/अं ९८२० अनिस शेख, पो/अं १००१६ शिया गायकवाड, पो/अं १०१४७ संदीप घुले, पो/अं १००५७ सुजय पवार, पो/अं ८२३९ सोमनाथ कांबळे, पो/अं ९९६३ दिपक खंदाड, पो/अं १००६२ फिरोज शेख, पो/अं १००६८ रमेश चव्हाण, पो/अं ३५४१ प्रविण गोडसे व मपो/अं. ३००४ अनिता धायतडक यांनी एकत्र मिळुन केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

