तोडफोडीच्या गुन्हयातील अल्पवयीन ०९ बालकांसह त्यांचे पालकांविरुध्द गुन्हा दाखल पर्वती पोलीसांची कारवाई
पत्रकार :- राजशेखर जाधव पुणे शहर
पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि.१८/०३/२०२४ रोजी पर्वती पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ११३/२०२४ भा.दं.वि.कलम ४२७.३४,१४३,१४७,१४८, १४९, फौजदारी सुधारणा कायदा कलम ७ व मोटार वाहतुक कायदा कलम १९९ (अ) तसेच भारताचा हत्याराचा कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयामध्ये एकुण ०९ विधीसंघर्षीत बालकांनी सदर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन सदर बालकांनी दांडेकर पुल नव महाराष्ट्र भागामध्ये तीन दुचाकींवर येवुन काही मोटार सायकलींची तोडफोड केली होती. वरिष्ठांचे सुचना नुसार पर्वती पोलीसांच्या तपास पथकाने तात्काळ कारवाई करुन गुन्हयातील सर्व अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेवुन त्यांचे वर योग्य ती कायदेशीर कारवाई केली तसेच सदर गुन्हयामध्ये या बालकांना हत्यारे देणारा लोहार नामे भावेश दिपक चव्हाण, वय २१ वर्षे धंदा लोहार काम, रा. १०९०, आग्रसेन भवन शेजारी, रविवार पेठ, पुणे यास देखिल शोध घेवुन सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन बालकांना नमुद वाहन मालक/पालकांनी यांनी गाडी वापरण्यासाठी दिलेले वापरकर्ते हे अल्पवयीन असल्याचे माहित असताना व त्यांचे कडे वाहन चालविण्याचा कोणताही वैध परवाना नसताना देखील गाड्या चालविण्यास दिल्या त्यामुळे त्यांचे पालकांना देखील गुन्हयात सह आरोपी करण्यात आलेले असुन त्याचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच गुन्हयात वापरलेल्या सर्व मोटार सायकल या जप्त करण्यात आल्या असुन यापुढे देखिल तोडफोडीच्या गुन्हयामध्ये अल्पवयीन बालकांचा सहभाग आढळुन आल्यास त्यांचे वर व त्यांना गुन्हयासाठी मदत करणाऱ्या इसमांवर तसेच पालकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार असले बाबत पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी कळविले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त साो. पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उप आयुक्त सो. परि-३ श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त साो. सिंहगडरोड विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. पर्वती पोलीस स्टेशन पुणे, नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सचिन पवार, पोलीस हवा कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, अनिस तांबोळी, सुर्या जाधव, दयानंद तेलंगे-पाटील, सद्दाम शेख, अमोल दबडे, अमित चिव्हे, पुरुषोत्तम गुन्ला, अक्षय खन्ना यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

