कर्जाची परत फेड करण्यासाठी त्याने चोरल्या तब्बल १० दुचाकी, समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाने आरोपीस ठोकल्या बेडया.


पंकेश जाधव संपादक 7020794626

समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत दि.२६/०७/२०२४ रोजी फिर्यादी यांची स्प्लेंडर मोटरसायकल चोरी झाली होती. फिर्यादी यांचे तक्रारीवरून दि.३१/०७/२०२४ रोजी समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १७१/२०२४ भा. न्याय संहीता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व अमंलदार करीत होते. दाखल गुन्हयातील चोरी झालेल्या मोटरसायकलचा शोध घेण्याकरीता तपास पथकाने गुन्हा घडल्याच्या ठिकाणापासुन तब्बल ७० ते ८० सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासुन तसेच पोलीस शिपाई/कल्याण बोराडे, पोलीस शिपाई/ शरद घोरपडे यांच्या गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत आरोपीचा मागोवा घेत असताना सारस्वत कॉलनी, सोमवार पेठ परीसरात एक इसम त्याच्याकडे पाहुन संशयीतरीत्या त्याचे ताब्यातील मोटरसायकलवरून पळुन जावु लागल्याने त्यास पाठलाग करुन सोबतचे पोलीस स्टाफच्या मदतीने समर्थ पोलीस स्टेशन येथे आणुन विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता सदर इसमाने त्याचे नाव अरविंद मोतीराम चव्हाण वय ३९ वर्षे, रा.दौंड, जि.पुणे असे सांगुन त्याच्या ताब्यातील मोटरसायकल शाहु उद्यान, सोमवारपेठ एस व्ही युनिअन शाळे समोरून चोरी केली असल्याची कबुली दिली. सदरची मोटरसायकल चोरीस गेलेबाबत समर्थ पो.स्टे. येथे गु.र.न.१७१/२०२४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झालेनंतर सदर इसमास दाखल गुन्हयात अटक करुन त्याचेकडे अधिक तपास केला असता आरोपीने त्याचेवर झालेल्या कर्जाची परतफेड करण्याकरीता यापुर्वी पुणे रेल्वे स्टेशन परीसरातील दुचाकी वाहनांची चोरी करुन दौंड परीसरातील लोकांना सदरची वाहने स्वताचीच आहेत असे खोटे सांगुन विकली असल्याबाबत कबुली दिल्यानंतर आरोपीकडुन तब्बल १० दुचाकी जप्त करण्यात आल्या असुन यामध्ये बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे व समर्थ पोलीस स्टेशन, पुणे येथील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले
आहेत.

Advertisement

 

सदरची कामगिरी ही मा.श्री. प्रविण पाटील अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा. श्री. संभाजी कदम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३. अतिरीक्त कार्यभार परिमंडळ-०१ पुणे शहर, मा. श्रीमती. नुतन पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणेशहर, श्री. उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, सहाय्यक फौजदार पागार, पो.हवा/इम्रान शेख, पो.हवा/रोहीदास वाघेरे, पोहवा/रविंद्र औचरे पो.हवा/शिवा कांबळे, पो.हवा/अमोल गावडे, पोना/रहीम शेख, पो.अं/शरद घोरपडे, पो. अं/कल्याण बोराडे, पो. अ/अविनाश दरवडे, पो.अं/अर्जुन कुडाळकर यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!