पुण्यात भारी… फरासखाना पोलीस स्टेशनची कामगिरी ! इलेक्ट्रॉनिक्स दुकान फोडून वायर चोरी; पाच जण ताब्यात, २.२६ लाखाचा मुद्देमाल जप्त…


प्रतिनिधी अक्षय जाधव
फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :- फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. चोरीस गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.
दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी फरासखाना पोलीस स्टेशन  हद्दीत ‘श्री भारतीय इलेक्ट्रॉनिक्स’ या दुकानाचे शटर उचकटून सुमारे १ लाख २५ हजार रुपयांच्या पॉलीकॅब इलेक्ट्रिकल वायरची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा माग काढला. सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी तपासाची दिशा निश्चित केली
दरम्यान, पोलीस अंमलदार प्रवीण पासलकर, महेश राठोड व सुमित खुट्टे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर वडारवाडी परिसरात सापळा रचून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी आदित्य संतोष बंडगर (वय २०), प्रेम भाऊराव बोदडे (वय २१), पवन संजय चव्हाण (वय १६, सर्व रा. वडारवाडी, शिवाजीनगर) यांना अटक केली, तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून चोरीस गेलेली पॉलीकॅब वायर तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोपेड दुचाकी असा एकूण २ लाख २६ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१ पुणे शहर श्री. कृषिकेश रावले. मा. सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरी. वैभव गायकवाड, पोलीस उप-निरी. अरविंद शिंदे, पोलीस उप-निरी. संतोष गोरे, पोलीस अंमलदार कृष्णा निढाळकर, प्रविण पासलकर, महेश राठोड, तानाजी नांगरे, नितीन तेलंगे, नितीन जाधव, गजानन सोनुने, सुमित खुट्टे. चेतन होळकर, प्रशांत पालांडे, आनंद माने, महेश पवार, शशिकांत ननावरे यांनी केलेली आहे.
या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!